कोरोनामुळे विविध राजकीय पक्षांना काम करण्याची संधीच मिळाली नाही. अनेक नेते, राजकीय कार्यकर्ते संसर्ग होऊ नये म्हणून जास्त वेळ घरातच थांबत असत. आता संसर्ग कमी होताच काही राजकीय मंडळी बाहेर पडली आहेत. स्थानिक प्रश्नांवर दररोज महापालिका प्रशासनासोबत वाद घालण्याचे काम एका पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येतेय. गळ्यात पक्षाचा रुमाल, चार कार्यकर्ते घेऊन कधी पाणीप्रश्न, तर कधी खड्डे, कचरा अशा प्रश्नांवर प्रशासनाची कोंडी करण्यात येत आहे. कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियमही जशास तसे आहेत. परवानगीशिवाय कोणतेही आंदोलन करता येत नाही, याचा विसर संबंधित राजकीय पक्षाच्या नेत्यांना पडला आहे. प्रशासन अजून संयमाने घेत आहे. प्रशासनाने तिसरा डोळा उघडला तर दररोज निवेदनांचा पाऊस पाडणारे, आंदोलन करणारे नेते संकटात येऊ शकतात. हा सर्व खटाटोप आगामी मनपा निवडणुकीत पक्षाला आणि स्वत:लाही जिवंत ठेवण्यासाठी सुरू असल्याची कुजबुज मनपा वर्तुळात आहे.
कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:02 AM