वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर भरधाव वाहनांना ब्रेक लागावे यासाठी मुख्य चौकात गतिरोधक उभारले आहेत. परंतु जड वाहनाच्या वर्दळीमुळे बहुतांश गतिरोधक तुटले आहेत.
वाहनधारकांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने या माहामार्गावर अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गतिरोधक दिसून यावेत व अपघताच्या घटना टळाव्यात यासाठी जागतिक प्रकल्प बँक अंतर्गत के.टी. संगम संस्थेतर्फे महामार्गावरील मुख्य चौकात उभारलेल्या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी शिवराई टोलनाका, वाळूज चौक, कामगार चौक आदी ठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आल्या.