शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पांढऱ्या सोन्यावर बळीराजाचा पुन्हा ‘सट्टा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:35 AM

मका, मूग, बाजरीत घट : तालुक्यात ६० टक्के पेरणी; नुकसान होऊनही कपाशीचा पेरा वाढला

मोबीन खानवैजापूर : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ८१ हजार २२ हेक्टर (६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील शंभर टक्के कपाशीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे कपाशीच्या पेºयात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, तसे न होता बळीराजाने पांढºया सोन्यावर पुन्हा सर्वाधिक सट्टा लावला आहे, तर मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाल्याची माहिती तालुका कृषि अधिकाºयांनी दिली.तालुक्यात यंदा खरीपाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३५ हजार ५६९ हेक्टर आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसानंतर तसेच त्यानंतर पडलेल्या खंडानंतर आलेल्या पावसानंतर तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी सुरू केली. ४ जुलैपर्यंत तालुक्यातील वैजापूर ( ९६७३), लासूरगाव (२३५२), लाडगाव (५९६८), महालगाव ( ९९५१ ), खंडाळा (१२९४१ ), शिऊर (१०१५०), गारज (६६५६), नागमठाण (२७५६), बोरसर (७८००), लोणी (१२७६४) अशा सर्व दहा महसुली मंडळात एकूण ८१ हजार २२ हेक्टरवर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. कपाशीची लागवड ५१ हजार ६४८ हेक्टर, मक्याची २१ हजार १९८ हेक्टर, बाजरी ३ हजार २९३ हेक्टर, सोयाबीन २९३ हेक्टर, भुईमुग १३४७ हेक्टर, मूग १५२८ हेक्टर, उडीद ४३ हेक्टर, तूर २४४ हेक्टर पेरणी क्षेत्राचा समावेश आहे.पावसाअभावी दुबार पेरणीचे संकटमृग नक्षत्राच्या सुरुवातीला बरसलेल्या जोरदार पावसाने आता मात्र दडी मारल्याने तालुक्यावर दुबार पेरणीच्या संकटाचे सावट आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाने ओढ दिल्याने ती वाया जाण्याचा धोका आहे. यामुळे तालुक्यातील चिंतातूर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाअभावी अनेक मंडळातील पिकांनी माना टाकल्या आहेत. महालगाव, खंडाळा, शिऊर, लोणी मंडळात दुबार पेरणीशिवाय शेतकºयांपुढे दुसरा पर्याय नाही. तालुक्यात ६० टक्के पेरणी झाल्याची नोंद कृषि विभागाच्या दरबारी आहे. उर्वरित ४० टक्यांच्या ठिकाणी न झालेल्या पेरण्या आणि पाऊस रुसल्याने खुंटलेली पिकांची वाढ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. गारज व लासूरगाव परिसरात पावसाअभावी पेरण्या ठप्प पडल्या आहेत.धरणे अजूनही कोरडेचतालुक्यात दहा ठिकाणी लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र पावसाला एक महिना उलटूनही बहुतांश धरणे मृत साठ्यातच जमा असल्याचे दिसते.नारंगी सारंगी प्रकल्प, जरूळ लघु तलाव, गाढेपिंपळगाव, सटाणा, खंडाळा, बिलोणी, बोरदहेगाव, वांजरगाव हे लघु तलाव कोरडेच असून मन्याड साठवण तलावात ३४.३३ टक्के, कोल्ही मध्यम प्रकल्पात ७.३ टक्के पाणी आहे.मंडळनिहाय झालेला पाऊसवैजापूर -१०३ मि.मी.खंडाळा -४८ मि.मी.शिऊर -९६ मि.मी.लोणी -५८ मि.मी.गारज -४९ मि.मी.नागमठाण -८० मि.मी.बोरसर-६४ मि.मी.महालगाव -१३१ मि.मी.लाड़गाव -१०७ मि.मी.लासूरगाव -६७ मि.मी.पावसाने दडी दिल्याने तालुक्यात केवळ ६० टक्के पेरण्या झाल्या असून ४० टक्के पेरण्या थांबल्या आहेत. यंदा तालुक्यात शेतकºयांनी पुन्हा ५१ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करुन पांढºया सोन्यावर विश्वास दाखविला आहे.-अनिल कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस