छत्रपती संभाजीनगर: राज्यात मागील एक वर्षी शिवसेनेत फूट होऊन भाजपसोबत नवीन सरकार स्थापन झाले. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राज्यात झालेल्या या आगळ्यावेगळ्या युतीच्या संताप व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'एक सही संतापाची' हे अनोखे आंदोलन आज सकाळपासून शहरात सुरू केले.
आज आणि उद्या दोन दिवस होत असलेल्या या आंदोलनात सकाळी विभागीय क्रीडा संकुल येथे आणि नंतर टीव्ही सेंटर चौक येथे एक सही संतापाची हे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी लावण्यात आलेल्या फलकावर अनेक नागरिक सह्या करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. एका नागरिकाने तर दलबदलू नेत्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त केली. सह्या करताना नागरिक त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
या कार्यक्रमाचे या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सतनामसिंग गुलाटी ,अशोक पवार ,सुमित खांबेकर ,राजीव जावळेकर मंगेश साळवे, विशाल पिंजारी, लीला राजपूत, शहर सचिव राहुल पाटील, महानगर अध्यक्ष बिपीन नाईक, उपजिल्हाध्यक्ष संकेत शेटे, शहराध्यक्ष आशिष सुरडकर,राज्य उपाध्यक्ष मनवासे मनीष जोगदंडे, जिल्हा संघटक प्रशांत दहिवाडकर, किरण जोगदंडे, प्रशांत आटोळे, झाकीर पठाण, किरण पाटील, सतीश मिसळ, संदीप शेजूळे, मच्छिन्द्र मोरे, महिंद्र खैरे, अवी गायकवाड यांच्या सह मनसे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.