शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
2
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
3
कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन
4
कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?
5
IND vs NZ 1st Test : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी पडला भोपळा
6
"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?
7
"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात करा तंत्रज्ञानाचा 'स्मार्ट' वापर!
9
तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा
10
पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर
11
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
12
गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
13
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
14
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
15
३ दिवसांत १३ विमाने उडविण्याच्या धमक्या; केंद्र सरकारकडून उपययोजना सुरू
16
Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश
17
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
18
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
19
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
20
"२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय घेणार"; जरांगे-पाटील आज अर्ज केलेल्या इच्छुकांशी संवाद साधणार

अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:34 AM

गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचे प्राबल्य आहे.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात विरोधक कोणाला रिंगणात उतरविणार याची तालुक्यातील जनतेमध्ये उत्सुकता लागली आहे.

गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचे प्राबल्य आहे. २००९ व २०१४ मध्ये अब्दुल सत्तार काँग्रेसच्या तिकिटावर, तर २०१९ मध्ये शिवसेनेकडून असे तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर, २००९ व २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश बनकर यांचा पराभव केला होता.

अब्दुल सत्तार ज्या पक्षात जातात त्या पक्षात त्यांचे कार्यकर्ते जातात. यामुळे या मतदारसंघात पक्षाला महत्त्व नाही केवळ सत्तार समर्थक व सत्तार विरोधक असा हा मतदारसंघ आहे. आघाडीतील वरिष्ठ नेते भाजपमधून उमेदवार आयात करून अब्दुल सत्तार यांना मात देण्याचे चक्रव्यूह रचत आहेत, तर आघाडीकडून तिकीट कुणाला सुटते सेना, काँग्रेस की राष्ट्रवादी यावर सर्वकाही अवलंबून आहे.

अनेक पहिलवान लंगोट बांधून तयारया निवडणुकीत अब्दुल सत्तार यांना मात देण्यासाठी भाजप कडून सुरेश बनकर, सुनील मिरकर, ठगन भागवत, काँग्रेसकडून भास्कर घायवट, कैसर आझाद, बनेखाॅ पठाण, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून रंगनाथ काळे, शेख शफिक, राहुल ताठे, शेख शाकेर, भाकपकडून सय्यद अनिस, एमआयएमकडून मुख्तार ऊर्फ बबलू, फईम पठाणसह २० आणखी उमेदवार लंगोट बांधून तयार आहेत.

बनकर उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?सिल्लोडची जागा युतीमध्ये शिंदेसेनेकडे जाणार हे निश्चित असून, यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत भाजपचे सुरेश बनकर हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा मतदारसंघात असून, ते शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून रिंगणात उतरू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Abdul Sattarअब्दुल सत्तारsillod-acसिल्लोडMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक