शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

‘नीट’ निकालाच्या भिन्न गुणपत्रिका, परीक्षार्थींच्या शैक्षणिक कारकिर्दीशी खेळतंय कोण?

By प्रभुदास पाटोळे | Published: November 02, 2022 7:32 PM

व्यापक जागृती करण्याचे उच्च न्यायालयाचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला आदेश

औरंगाबाद : संकेतस्थळावर उपलब्ध होणाऱ्या भिन्न गुणपत्रिका आणि त्यामुळे ‘नीट’च्या परीक्षार्थींना होणारा मनस्ताप यांचे वाढते प्रकार बघता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने आघाडीच्या वर्तमानपत्रांमधून विद्यार्थ्यांना आवाहन करणारे प्रगटन अथवा जाहिरात प्रकाशित करावी. तसेच आपल्या संकेतस्थळाद्वारे व्यापक जनजागृती करावी. अशा प्रकारे फसवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत तातडीने योग्य ती पावले उचलावीत, असे आदेश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. एस. ए. देशमुख यांनी दिले. भूमिजा नेमिचंद राठोड या विद्यार्थिनीच्या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले.

साधारणतः महिन्याभरातच भिन्न आणि विसंगत निकालपत्रिकांची तीनहून अधिक प्रकरणे आमच्या निदर्शनास आली. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासमक्षही अशाच केसेस दाखल झाल्याचे आम्हाला समजले आहे. या प्रकरणांची वाढती संख्या आणि व्याप्ती पाहता नीट परीक्षा राबविणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने विद्यार्थ्यांच्या हिताकरता तातडीने आपल्या संकेतस्थळावर व मुद्रितमाध्यमांद्वारे अशा प्रकारे फसवणूक अथवा दिशाभूल झालेल्या परीक्षार्थींनी आपल्या तक्रारींबाबत स्वत:हून पुढे येऊन आवाज उठविण्याचे आवाहन प्रकाशित करावे. सायबर शाखा अथवा सक्षम तपास यंत्रणांना अवगत करवून उचित तपास करण्याची विनंती करावी, असे न्यायालयाने म्हटले.

औरंगाबाद येथील भूमिजा हिने नीट परीक्षा दिली होती. निकाल ७ सप्टेंबर २०२२ला जाहीर झाला. भूमिजाने डाउनलोड केलेल्या निकालपत्रात ७२० पैकी ६६१ गुण दर्शविले होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्यासंबंधी तिच्या आशा पल्लवित झाल्या. तथापि, ३ दिवसांनंतर पुन्हा एजन्सीच्या संकेतस्थळावरून निकालपत्र डाउनलोड केले असता त्यात तिला अवघे २१८ गुण मिळाल्याचे निदर्शनास आले. भूमिजाने परीक्षा एजन्सीकडे ई-मेल पाठवून दाद मागितली. परंतु, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने तिने उच्च न्यायालयात दाद मागितली. सुनावणीदरम्यान ‘ओएमआर’ उत्तरपत्रिकांमधील उत्तरे अल्प गुण असलेल्या निकालपत्राशी जुळत असल्याने न्यायालयाने याचिका नामंजूर केली.

परीक्षार्थींच्या शैक्षणिक कारकिर्दीशी खेळतंय कोण?तथापि, देशभर अशा प्रकारे निष्पाप विद्यार्थ्यांच्या अमूल्य शैक्षणिक कारकिर्दीशी खेळणारे नेमके कुठले रॅकेट सक्रिय आहे की काय? एजन्सीच्या संकेतस्थळाशी कुणी सायबर गुन्हेगार छेडछाड करीत आहेत काय? याबाबत संशयास जागा असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. असे प्रकार देशभर किती ठिकाणी उद्भवले आहेत याचा एजन्सीने अभ्यासपूर्वक आढावा घ्यावा आणि घडल्या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन त्याबाबत गांभीर्याने कारवाई करावी, असे मत नोंदवले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. चैतन्य धारूरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मयूर सुभेदार यांनी साह्य केले. परीक्षा एजन्सीकडून ॲड. आशिष जाधवर यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducationशिक्षणNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल