शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

सभापती कोण होणार?

By admin | Published: September 29, 2014 12:18 AM

औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत.

औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत. त्याची गडद सावली जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीवर पडली आहे. दि.१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीतून नेमके कसे चित्र समोर येईल, याविषयी कुणालाही कल्पना करणे अवघड झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची २१ सप्टेंबर रोजी निवड झाली व २५ सप्टेंबर रोजी राज्यात राजकीय भूकंप झाला. त्याचे पडसाद सभापतीपदाच्या निवडणुकीवर उमटणे स्वाभाविक आहे.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीची सत्ता होती. या आघाडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यापूर्वीच खेचले आहे; परंतु आता सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची तोंडे परस्पर विरोधी झाली आहेत. युती व आघाडी फुटल्याने झालेल्या भूकंपातून अद्याप राजकीय मंडळी सावरलेली नाही. त्यात विधानसभेसाठी उमेदवाराची निवड, उमेदवारी दाखल करण्याची धावपळ करावी लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड दुय्यम ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी अद्याप कोणत्याही पक्षाने अद्याप काहीही रणनीती ठरविलेली नाही किंवा त्यावर चर्चाही झालेली नाही. फुटाफुटीमुळे गणिते बदलणार६० सदस्यीय जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष शिवसेना (१८ सदस्य) आहे. त्या खालोखाल काँग्रेस (१५), राष्ट्रवादी (११), मनसे (८) व भाजपा (६), असा क्रम आहे; परंतु राजकीय साठमारीमुळे चित्र बदलण्याची शक्यता दिसते आहे. गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच त्यांच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी युतीला पाठिंबा दिला होता. आता त्यांच्या प्रवेशाने भाजपाचे जिल्हा परिषदेतील बल ६ वरून ८ वर पोहोचले आहे. दुसऱ्या बाजूला सभापतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेचे पाच सदस्य सहलीवर गेलेले आहेत. त्यांची भूमिका पक्षाला मदत करण्याची राहील की, काँग्रेसला हे आताच सांगणे अशक्य आहे. जि. प. तील सर्व संबंधितांचे लक्ष आता १ आॅक्टोबरकडे लागले आहे.