छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील वरिष्ठांची चर्चा सुरू आहे. अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपन नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. एका लग्न समारंभनिमित्त ते शहरात आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना फडणवीस म्हणाले, आधी मुख्यमंत्री ठरेल आणि त्यानंतर इतर मंत्री ठरतील. मुख्यमंत्रिपदानंतर इतर मंत्र्यांची नावे समोर येतील.
ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या विरोधकांच्या आरोपांबाबत बोलताना फडणवीस म्हणतात, काल सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट, ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत सुरूच राहणार आहे. विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे.स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवायचं की नाही, हे आम्ही निर्णय घेऊ, त्याला अजून वेळ आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.