शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

कोण होणार कुलगुरू? पाच नावे बंद लिफाफ्यात कुलपतींकडे सुपूर्द

By राम शिनगारे | Published: December 01, 2023 7:49 PM

कुलगुरू निवड अंतिम टप्प्यात; २४ पैकी २२ जणांची मुलाखतीला हजेरी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी बुधवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजल्यापासून हजर २२ पात्रताधारकांच्या मुलाखती शोध समितीने घेतल्या. त्यातील पाच जणांच्या नावाची शिफारस केलेला बंद लिफाफा कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सायंकाळी सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिफारस केलेल्या पाच जणांपैकी एकाची कुलगुरूपदी कुलपती निवड करणार आहेत. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुलगुरू निवडीसाठी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली होती. या समितीने बुधवारी २४ पात्रताधारकांना मुलाखतीसाठी मुंबईतील आयआयटी, पवई येथे निमंत्रित केले होते. त्यापैकी २२ जणांनी मुलाखत दिली. डॉ. राजीव गुप्ता आणि प्रा. एस. के. सिंग हे दोन उमेदवार मुलाखतीसाठी अनुपस्थित होते. सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष मुलाखतींना सुरूवात झाली. प्रत्येक उमेदवाराने ‘पॉवर पाॅईंट प्रेझेंटशन’च्या माध्यमातून आपले विद्यापीठाविषयीचे व्हिजन-मिशन मांडले. सर्वांच्या मुलाखती पार पडल्यानंतर शोध समितीने पाच जणांच्या नावाची शिफारस कुलपतींकडे सायंकाळी बंद लिफाफ्यात केली. या पाच जणांना कुलपती राजभवनात मुलाखतीसाठी आमंत्रित करतात. त्यानंतर त्यातील एकाची निवड कुलगुरू म्हणून केली जाते.

विद्यापीठाला मिळणार १७ वे कुलगुरूविद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर पहिले कुलगुरू म्हणून मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. डोंगरकेरी यांनी पदभार स्वीकारला. विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सोळावे कुलगुरू ठरले होते. आता विद्यापीठाला पूर्णवेळ १७ वे कुलगुरू मिळणार आहेत. त्यांच्या नावाविषयी विद्यापीठाच्या वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसातच पाच नावे समोर येतील. तेव्हा १७ व्या कुलगुरूंचे नाव समोर येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद