छत्रपती संभाजीनगर : कुत्रे गाडीचे टायर, खांबावर का लघवी करतात? कुत्र्यांना उभं राहिल्यावर न वाकता किंवा बसता ज्या उंचीपर्यंत वास घेता येतो तितक्या उंचीवर ते लघवी करतात. शिवाय जमिनीवर पाण्याने किंवा धुळीने हा गंध काही वेळाने नाहीसा होऊ शकतो; पण, धातूचे खांब किंवा रबरी टायरवर गंध अधिक काळ तसाच राहतो. म्हणूनच थेट जमिनीवर लघवी न करता कुत्रे खांब, वाहन तसेच त्याच्या चाकावरच करतात.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, काही जण पाळीव कुत्र्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देतात. त्यांनी घरभर कुठेही घाण करून ठेवू नये म्हणून त्याला विशिष्ट मोकळी जागा देण्याचा प्रयत्न असतो. कारण या प्राण्याने कुठेही घाण केली तर त्यावरून अनेकदा शेजाऱ्यांची भांडणे होतात.
आपल्याला त्यांचा संकेत कळू शकत नाहीमाणसाचा प्रामाणिक मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांवर अनेक जण अगदी जिवापाड प्रेम करतात. लहान बाळासारखे कुत्र्यांचे संगोपन केले जाते. काही वेळा पाळीव श्वान काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात; पण, आपल्याला त्यांचा संकेत कळू शकत नाही किंवा अनेकदा त्यांच्या एखाद्या सवयीचा उलगडा होत नाही. त्यामागचे कारण जाणून घेतले पाहिजे.- जयेश शिंदे (श्वानप्रेमी)
कुत्रे आपले क्षेत्र म्हणजेच ‘टेरिटरी’ मार्क करतात...पहाटे किंवा सायंकाळी अनेक जण कुत्र्याला दोरी बांधून फिरवून आणतात. कुत्रे बहुतांश वेळा घराच्या कपाटावर किंवा गाडीच्या टायरवर लघवी करतात. श्वानतज्ज्ञांच्या मते कुत्रे आपले क्षेत्र म्हणजेच ‘टेरिटरी मार्क’ करण्यासाठी असे करतात. इतकेच नव्हेतर, याच गंधातून कुत्र्यांनी जोडीदार किंवा मित्रांसाठी पाठवलेला हा संकेत असतो.- डॉ. नीलेश जाधव (पशुवैद्य)