शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाया का नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 7:44 PM

जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत तहसीलदारांनी त्यांच्या भागात कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितले होते.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बेकायदेशीर गौण खनिजचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाया का होत नाहीत, असा सवाल उपस्थित करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोमवारपर्यंत खुलासा करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वाळू, मुरूम, खदानीतून अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. नदीपात्रांची चाळणी होत असून डोंगर भुईसपाट होत आहेत. अवैध स्टोन क्रशरमुळे डोंगररांगा नष्ट होण्याची भीती आहे. 

प्रशासनाने तहसील पातळीवर वारंवार कारवाईचे आदेश दिले. त्यासाठी तहसीलदारांना शस्त्रधारी सुरक्षा रक्षकही दिले. तरीही कारवाया होत नसल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. तहसीलदारांसह स्थानिक पातळीवरील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई फिरते आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आणि जिल्हा गौणखजिन अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागली. १ एप्रिलपासून आजपर्यंत १९ वाहने पकडली. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना या प्रकरणात कानपिचक्या दिल्या. ‘लोकमत’ने ३० जुलै रोजीच्या अंकात ‘वाळू माफियांचा धुमाकुळ, जिल्ह्यातील नद्यांची चाळणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या महसूल यंत्रणेला फैलावर घेत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितलेजिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत तहसीलदारांनी त्यांच्या भागात कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितले होते. कुठेही अवैध स्टोन क्रेशर सुरू नसल्याचा दावाही केला. परंतु, त्या बैठकीनंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चितेगाव परिसरात कारवाईत पाच अवैध स्टोन क्रशर सील केले, तर सावंगी परिसरात तब्बल ८ स्टोन क्रशर चालकांवर गुन्हा दाखल केला. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कावसान येथे अवैध वाळू उत्खनन करणारी सात वाहने पकडली.

तीन महिन्यांत फक्त ७८ कारवायाजिल्ह्यातील ९ तालुके, छत्रपती संभाजीनगर अपर तहसीलसह १० कार्यालयाने तीन महिन्यांत केवळ ७८ कारवाया केल्या आहेत. एक कोटी ५५ लाख ६१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी केवळ ७६ लाख ३९ हजार वसूल केले. पाचजणांवर गुन्हा दाखल केला. वैजापूर येथे दोघांना अटक केली. ७८ वाहने आणि १ यंत्र जप्त केले.

तहसीलनिहाय कारवाया अशा...गंगापूर ...६वैजापूर...९वैजापूर...१५छत्रपती संभाजीनगर ग्रामीण...१३छत्रपती संभाजीनगर शहर...६उ.वि.अ. छत्रपती संभाजीनगर...१९खुलताबाद...३कन्नड...१२उ.वि.अ. कन्नड...१५सिल्लोड...३सोयगाव...००उ.वि.अ. सिल्लोड..३फुलंब्री...४पैठण...२२उ.वि.अ. पैठण..२६एकूण.......७८

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादsandवाळूCrime Newsगुन्हेगारी