शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

भाजपबरोबर जाता मग कम्युनिस्टांबरोबर का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:49 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल.

ठळक मुद्देउद्धव कांबळे : जातीचा प्रश्न वर्गाच्या साच्यात बसवा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल. अर्थात मार्क्सवाद्यांनी जातव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहेच. त्यांच्या लाख चुका असल्या तरी वर्गसंघर्षातलं त्यांचं सातत्य कुणीही नाकारू शकत नाही. राजकारणात तुम्ही भाजपबरोबर जाऊ शकता मग कम्युनिस्ट का चालत नाहीत? असा खडा सवाल आज येथे औरंगाबादचे माजी पोलीस आयुक्त उद्धव कांबळे यांनी उपस्थित केला.‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद: नवे आकलन आणि दिशा’ या आपल्या ग्रंथावरील परिसंवादात प्रा. राहुल कोसंबी व प्रा. उमेश बगाडे यांच्या मांडणीनंतर उद्धव कांबळे हे आपली बाजू मांडत होते. मराठवाडा महसूल प्रबोधिनीत झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉ. भगवानराव देशपांडे होते. प्रगतिशील लेखक संघ व लोकवाङ्मयाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रकाशक या नात्याने कॉ. भालचंद्र कांगो यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. ‘जयभीम - लाल सलाम’हा नारा अपघात नव्हे तर तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. टीका झाल्याशिवाय क्रांतीचा रथ पुढे जाणार नाही. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांचा विचार करूनच पुढे जावयाचे आहे, असे ते म्हणाले.जातीची अट हा मोठा अडथळा...उद्धव कांबळे यांनी सांगितले की, वर्ग भान निर्माण करण्यात जातीची अट हा मोठा अडथळा होय, असा अडथळा म्हणजे सवतासुभा व वेगळी ओळख निर्माण करण्याचे राजकारण होय. नुसती राज्यघटना असून चालत नाही, तर तिला संस्थात्मक निर्मितीचं पाठबळ द्यावं लागतं.१८५६ सालानंतरच्या कायद्यांमध्ये काहीही बदल झाला नाही. नोकरशाही व न्याय व्यवस्थेतसुद्धा काही बदल झालेले नाहीत. आज जगभर एक भीषण संकट उभे राहत आहे, ते हिटलरशाहीचं. हे आव्हान वेळीच पेलवलं जाण्याची गरजही कांबळे यांनी प्रतिपादिली. फाळणीच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना तयार झाली. काही मुद्यांवर राज्यघटनेनेही सायलेन्सेस पाळलेली दिसून येते. ते मुद्देही त्यांनी मांडले.कॉ. प्रकाश बनसोड, सुनील उबाळे, धम्मपाल जाधव आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. चळवळीतील कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण