औरंगाबाद : शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण गेट ते गुलमंडी हा वन वे (एकेरी वाहतूक) नावालाच असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले. या रस्त्यावर वन वेचा नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे बाराभाई ताजियांकडून पैठणगेटकडे वाहने पळविताना दिसली.
शहरातील प्रमुख बाजारपेठपैकी पैठण गेट ते गुलमंडी या रस्त्याचा समावेश होतो. या रस्त्यावर सकाळी, सायंकाळी ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात. ही बाब लक्षात घेऊन अनेक वर्षांपासून हा रस्त्यावरील वाहतूक एकेरी ठेवण्यात आली. कालांतराने या रस्त्याचे रुंदीकरण झाले. ग्राहकांची रस्त्यावर उभी राहणारी वाहने, हॉकर्स आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा रास्ता एकेरीच ठेवला आहे. या वन वे रस्त्याचा सर्वांनी नियम पाळावा याकरिता वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी बाराभाई ताजीया चौकात तैनात केले आहे, असे असले तरी वाहनचालक या रस्त्यावरील मधल्या गल्लीतून ये-जा करताना वन वेचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या रिॲलिटी चेकमधून दिसून आले. रिक्षाचालक, दुचाकीस्वार बिनधास्तपणे पैठणगेटच्या दिशेने वाहने पळवित असल्याचे दृष्टीस पडले. या वाहनांचा त्रास नियमानुसार वन-वेचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागत होता.
=========
अनेक वन-वे झाले दुहेरी
शहरातील सिटीचौक ते जुना पोस्ट ऑफिस रस्ता वन वे होतामात्र रास्ता रुंदीकरण झाल्यापासून हा रास्ता दुहेरी वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. यासोबत शहागंज ते चेलीपुरा रस्ताही दुहेरी वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. सिटीचौक ते गुलमंडी हा रास्ता एकेरी आहे. मात्र शेजारील रंगारगल्ली रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून हा मार्ग सध्या दुहेरी ठेवण्यात आला. पुढे गोमटेश मार्केट ते औषधीभवन रस्ताही एकेरी आहे. परंतु या रस्त्याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नाही.
=========
विरूध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या १७ हजार ६६२ वाहनचालकांवर गतवर्षी कारवाई करण्यात आली. या कारवाईत त्यांच्याकडून तब्बल ३५ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.
--्-==================(
वाहतूक पोलिसांना चुकवून विरुद्ध दिशेने पळतात वाहनचालक
बाराभाई ताजिया येथे वाहतूक पोलीस तैनात असतात. यामुळे वाहनचालक आतल्या गल्लीतून मुख्य रस्त्यावर येतात आणि विरुद्ध दिशेने पैठणगेट्कडे जातात . शिवाय दुपारी पोलीस कर्मचारी जेवण्यासाठी जातात, यावेळी एकेरी वाहतुकीचा नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचे दिसून आले.
==========
कोट
विरुद्ध दिशेने वाहन चालविणारे स्वतःचा आणि अन्य वाहनचालकांचा जीव धोक्यात घालत असतो. विरुद्ध दिशेने वाहने पळविणाऱ्या तब्बल १७ हजार ६६२ वाहनचालकांवर गतवर्षी केसेस करण्यात आल्या. या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय अनेक रस्त्यांवर महापालिकेने काम सुरू केल्यामुळे काही एकेरी रस्ते दुहेरी वाहतूक साठी खुले करण्यात आले.
====मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा