शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

छत्रपती संभाजीनगरात गर्भपाताच्या औषधांची सर्रास विक्री, विक्रेते रंगेहाथ जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:30 IST

अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारीच गेले डमी ग्राहक बनून : सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : गर्भपातासाठी वापरली जाणारी एमटीपी किट विना प्रिस्क्रिप्शन व अवैधरीत्या विकणाऱ्या दोन मेडिकल चालकांसह एका औषधी होलसेल विक्रेत्याचा गुरुवारी पर्दाफाश झाला. शेख जैद पाशा अयुब पाशा (रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर), संजय पुष्करनाथ कौल (उस्मानपुरा) आणि अभिलाष विजय शर्मा (समर्थनगर) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर गुरुवारी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जैद आणि अभिलाष दोघे मेडिकल चालवतात, तर संजयची औषधांची होलसेल एजन्सी आहे. काही दिवसांपूर्वी अबरार कॉलनीच्या आरफत मेडिकल स्टोअर्सवर गर्भपाताच्या किट सहज उपलब्ध होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. निरीक्षक जीवन जाधव व अंजली मिटकर यांनी स्वत: बनावट ग्राहक बनून आरफत मेडिकल स्टोअर्सवर किटची मागणी केली असता शेख जैदने त्यांना खिशातून किट काढून दिली. त्यासाठी कुठल्याही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मागितले नाही. अधिकाऱ्यांनी तत्काळ स्वत:ची ओळख सांगून मेडिकलचा ताबा घेतला.

चौकशीत डिस्ट्रीब्युटर्सचे नाव निष्पन्नजैदने सदर किट जाधववाडीतील कौल डिस्ट्रीब्युटर्सच्या संजय कौलकडून आणल्याची कबुली दिली. अधिकाऱ्यांनी तत्काळ जैदला संजय कौलला फोन करण्यास सांगितले. जैदने कॉल करून संजयला दोन किटची मागणी केली. त्यानुसार संजयने देखील घरपोच देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पथकाने जैदला संजयमार्फत पाठवलेल्या किट देताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.

समर्थनगरमधील अभिलाष तिसरा आरोपीसंजयने किट दिल्याचे पुराव्यासह निष्पन्न झाल्याने त्याला आरोपी करून चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. चौकशीत संजयने किट वरद गणेश मंदिराजवळील मेडिकलवाला या दुकानाचा चालक अभिलाष शर्माकडून खरेदी करत असल्याची कबुली दिली. तिघांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी तिघांवरही सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक दिलीप बचाटे अधिक तपास करीत आहेत. तिघांकडेही किटचा मोठा साठा सापडला नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी