शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

सिल्लोड तालुक्यात सर्वदूर वादळीवाऱ्यासह पाऊस; अनेक घरांवरील पत्रे उडाली, भिंती पडल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 6:29 PM

उन्हाळी बाजरी, कांदा सिड्सचे जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले

सिल्लोड: तालुक्यात आज दुपारी अजिंठा, भराडी, गोळेगाव, उंडणगाव, शिवना, गेवराई सेमी, आमठाणा, अंभई  परिसरासहित आठ ही महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या, अनेक घरांवरील टिन पत्रे उडाली. तर उन्हाळी बाजरी, कांदा सिड्सचे जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

याची माहिती मिळताच सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार विक्रम राजपूत, तालुका कृषी अधिकारी न्यानेश्वर बरदे, गटविकास अधिकारी डी. एस. आहिरे  यांनी गेवराई सेमी, बाभूळगाव, बंनकीनहोळा  परिसरात जाऊन  स्वतः नुकसानीची पाहणी केली. या शिवाय तलाठी, मंडळ अधिकारी यांनी ठीकठिकाणी नुकसानीचे पंचनामे केले.

गेवराई शेमी येथिल  विनायक  ताठे यांच्या राहत्या घराचे ४० टिन पत्रे उडाली, योगेश जगन्नाथ ताठे, विलास ताठे यांच्या राहत्या घराचे ३० ते ४० टिन पत्रे उडाली. उडालेली टिन पत्रे लागल्याने चार जनावरे जखमी झाली. तर एका गायीचा मृत्यू झाला. तालुक्यातील पळशी,के-हाळा, अंधारी,गेवराई सेमी, बाभूळगाव, बंनकीनहोळा कायगाव, टाकळी , भराडी, मोढा, बोरगाव, अनाड, अजिंठा परिसरात अनेक घरांचे टिन पत्रे उडाली. घराच्या भिंती पडल्या, पिकांचे नुकसान झाले. मोढा बु येथील प्रभू साडू ढोरमारे, नारायण सांडू, केशव सांडू याच्या राहत्या घराची पत्रे वाऱ्याने उडाली पिंपळगाव पेठ येथे  कैलास रामकृष्ण सांगळे यांचे राहत्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले.  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस