शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

रंगेल पतीला परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये पकडून पत्नीने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:44 AM

परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारण्यात दंग झालेल्या नव-याला पत्नीने दामिनी पथकाच्या मदतीने चांगलाच हिसका दाखविला. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण वाचविल्याची आख्यायिका सर्वांना माहीत आहे; परंतु परस्त्रीच्या मोहात अडकलेल्या पतीची सोडवणूक करण्यासाठी एका या नारीने केलेल्या प्रयोगामुळे सोमवारी अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.त्याचे झाले असे की, परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारण्यात दंग झालेल्या नव-याला पत्नीने दामिनी पथकाच्या मदतीने चांगलाच हिसका दाखविला. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी घडली.जयभवानीनगरातील रहिवासी ३५ वर्षीय सुशील (नाव बदलले) हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पुंडलिकनगर रोडवर त्याचे कार्यालय आहे. विविध कंपन्यांना तो कामगार पुरवितो. काही दिवसांपूर्वी रत्ना (नाव बदलेले) ही तरुणी त्याच्याकडे नोकरी मागण्यासाठी आली होती. नोकरी देऊन त्याने तिला त्याच्या कार्यालयातच ठेवले. रत्नासोबत त्याची मैत्री वाढली. सुशील सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रत्नाला घेऊन बसस्थानक परिसरातील हॉटेलात गेला. दोघे तेथे गप्पा मारत असल्याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. यामुळे पत्नी संतप्त झाली आणि पतीला धडा शिकविण्यासाठी तिने थेट पोलिसांच्या दामिनी पथकाला पाचारण केले. सुशील त्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगल्याची तिने खात्री केली आणि दामिनी पथकाला सोबत घेऊन हॉटेल गाठले. तिने थेट हल्लाबोल करून पती सुशीलला चक्क सर्वांसमोर बदडून काढले. एवढेच नव्हे तर रत्नालाही तिने खडेबोल सुनावले. पोलिसांच्या वाहनातून सुशील आणि रत्नाला एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे या घटनेची नोंद करण्यात आली.महिलांशी लगट करण्याची सुशीलला सवय आहे. स्त्रियांना हॉटेलमध्ये नेऊन कार्यभाग उरकण्याच्या तो सतत प्रयत्नात असतो. त्याच्या गैरवर्तनाच्या तक्रारी पत्नीला अनेक दा आल्या होत्या. तिने त्याची समजूतही काढली होती. मात्र, सुशीलचा बाहेरख्यालीपणा कमी होत नव्हता. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीची आज चांगलीच खोड मोडल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले. हा कौटुंबिक वादाचा प्रकार असून, सुशीलचे घर पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे तक्रार नोंदविण्याचे त्याच्या पत्नीला सांगण्यात आले. शिवाय रत्नानेही तक्रार नोंदविण्यास नकार दिला.