शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

औरंगाबाद जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; आरोपी पती अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 4:14 PM

जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीला जबर मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली.

औरंगाबाद :  जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीला जबर मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ५ ) रात्री फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण येथे घडली. कांताबाई दादाराव दाढे ( २७ ) असे मयत महिलेचे नाव असून दादाराव अण्णासाहेब दाढे (३५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गत आठवड्यातील सताळ पिंप्री येथील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद - जळगाव राज्य मार्गावरील नायगव्हाण शिवारातील शेत वस्तीवर दाढे कुटुंब मागील अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. या ठिकाणी दादाराव दाढे यास आठ एकर जमिन आहे. येथेच एका कूड पञ्याच्या खोलीत ते राहतात. बाजूलाच काही अंतरावर त्याचा मोठा भाऊ राहतो. बुधवारी रात्री दाढे कुटुंब जेवण करीत असताना दादाराव याने दारुच्या नशेत तर्रर्र होऊन पत्नी कांताबाई सोबत वाद घातला. यानंतर दादारावने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. काठीने बेदम मारहाण केल्याने ती जागीच बेशुद्ध होऊन कोसळली. मारहाण केल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली की झोपी गेली याचे साधे भानसुद्धा दादारावला नव्हते, तो तेथेच झोपी गेला.यावेळी त्यांची लहान मुलेही झोपी गेली होती. 

काही वेळाने एका मुलास जाग आल्याने त्याने आईस उठवण्याचा प्रयत्न केला असता ती शुद्धीवर आली नाही. त्याने दारुच्या नशेत झोपलेल्या दादारावला उठवले. दादारावने पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तीने हालचाल केली नाही. याची माहिती नातलगांना व शेजाऱ्यांना मिळाल्याने ते जमू लागले. १०८ रुग्ण वाहिकेला फोन करुन घटनास्थळी बोलावण्यात आले.  परंतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत  घोषीत केले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास वडोदबाजार ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी कर्मचाऱ्यां समवेत घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान,  आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत कांताबाई हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठले व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे दुपारी बर्‍याच वेळाने शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. ज्या लाकडी काठीने त्याने पत्नीला मारहाण करून यमसदनी पाठवले ती काठी पोलिसांनी ताब्यात घेतली.