सोयगाव : परिसरात खरिपाच्या पिकांसह बागायती पिकांवर रोहींचे आणि हरणांचे कळप डल्ला मारीत आहेत. शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी सोयगाव तालुका वसला आहे. यामुळे शिवारात रोही व हरणांचे कळप वास्तव्यास आहेत. नुकतेच उगवून आलेल्या कोवळ्या अंकुरावर हे कळप डल्ला मारीत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे पावसाचा पाच दिवसांचा खंड आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांचा पिकांवर होत असलेला हल्ला खरिपाच्या हंगामासाठी धोकादायक ठरत आहे. वन विभागाच्या पथकाकडून वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची रविवारी वनरक्षक माया झिने यांनी पाहणी केली आहे.
छायाचित्र ओळ-
जरंडी शिवारात वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करताना वन विभागाचे पथक.
200621\aur20jrndp01.jpg
सोयगाव-जरंडी ता सोयगाव शिवारात वन्यप्राण्यांच्या नुकसानीत पिकांची पाहणी करतांना वनविभाग