औरंगाबाद : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे सुरूच होते. वारंवार मुदतवाढ देवूनही विलंबाने तब्बल ४ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याने विभागीय मंडळाला कसरत करावी लागली. तर भयमुक्त आणि काॅपीमुक्त परीक्षेसाठी विभागात तब्बल ४९ भरारी पथकांची विभागात स्थापना करण्यात आली आहे. तसेच महसुल यंत्रणेचे तालुकानिहाय १ भरारी आणि केंद्रनिहाय २ जणांचे बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहीती विभागीय सचिव विजय जोशी यांनी दिली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाची लेखी परीक्षा नांदेडचा कॉपीमुक्त पॅटर्न नुसार घेण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे भरारी पथकासह, बैठे पथक आणि अन्य विविध विभागांच्या दहा पथकांचे नियोजन विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विभागात ४३० केंद्रांवर १ लाख ६९ हजार ९८० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तणामुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मीतीसाठी परीक्षा केंद्र संचालकांच्या बैठका घेण्यात आल्या. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्र संचालकांच्या बैठक पार पडली. परीक्षा केंद्रात ५० मिटरमध्ये परीक्षेशी संबंधीत कुणालाही प्रवेश देवू नये. परीक्षेतील गैरप्रकार केल्यावर उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरील सुचना परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना वाचुन दाखवण्यासह गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रतिबंध उपयायोजना केल्या आहेत. अशी माहीती विभागीय मंडळाचे सचिव विजय जोशी दिली.
संवेदनशिल ४८ केंद्रावर स्वतंत्र पथकसंस्थाचालक, मुख्याध्यापक, केंद्र संचालकांना काॅपीमुक्त आणि निकोप वातावरणात परीक्षेसाठी सुचना दिल्या आहेत. महसुल विभाग, शिक्षण विभागाची भरारी व बैठे पथके परीक्षेवर नजर ठेवून असतील. तसेच संवेेदनशिल ४८ केंद्रावर ३ जणांचे बैठे पथक तसेच इतर केंद्रावर प्रत्येकी २ जणांचे बैठे पथक महसुल विभागाने नेमले आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार होणार नाही. यासाठी संस्था, शाळा, केंद्र संचालकांनी लक्ष द्यावे.-एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद
असे आहेत भरारी पथकेविभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक, योजना शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, विद्या प्राधिकरण, डाएट, महिलांचे स्वतंत्र पथक असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर २ जणांचे बैठे पथक परीक्षेच्या आधी एक तास ते परीक्षेनंंतर एक तास उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
अशी आहे आकडेवारीजिल्हा -कॉलेज- परीक्षा केंद्र - परीक्षार्थीऔरंगाबाद ---४७०---१५७ --६०,९२६बीड ---२९८ ---१०१ -३९,१८५परभणी ---२३३---५९ ---२४,७०५जालना --- २३९ --८० ---३१,५००हिंगोली ---१२०--- ३३ ----१३,४८५एकूण -१,३६० ---४३०---१,६९,८०१