शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

औरंगाबाद शहराला आजारी पाडणार काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:35 AM

शहरातील १५ लाख नागरिकांना आजारी पाडण्याचा सोयीस्कर डाव महापालिकेने आखला आहे. शहरात दररोज निघणारा ४०० मेट्रिक टन कचरा टाकायचा कुठे, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून नारेगावच्या शेतकºयांनी जोरदार आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देकचरा कोंडी सुरू : नारेगावात बंदी, बाभूळगाव, मिटमिट्यातही विरोध; आजपासून वॉर्डांमध्ये कचरा जिरविण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना आजारी पाडण्याचा सोयीस्कर डाव महापालिकेने आखला आहे. शहरात दररोज निघणारा ४०० मेट्रिक टन कचरा टाकायचा कुठे, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून नारेगावच्या शेतकºयांनी जोरदार आंदोलन सुरू केले. पर्यायी व्यवस्था म्हणून बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर कचरा टाकण्यात आला. यालाही परिसरातील नागरिकांनी तिव्र विरोध केला. तिसरा पर्याय म्हणून मिटमिटा येथील सफाई पार्कच्या जागेवर कचºयाच्या गाड्या वळविण्यात आल्या. तेथेही मनपाला विरोधच सहन करावा लागला. कचºयाचे ट्रक ठिकठिकाणी उभे आहेत, हा कचरा नेमका टाकायचा कुठे याचे कोडे महापालिकेला सायंकाळपर्यंत सोडविता आले नाही.नारेगाव येथे महापालिका ३४ वर्षांपासून फक्त कचरा नेऊन टाकत आहे. या कचºयावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नाही. येथे २० हजार मेट्रिक टन कचºयाचे मोठ-मोठे डोंगर तयार झाले आहेत. या कचºयामुळे नारेगाव परिसरातील आठ ते दहा गावांमध्ये राहणाºया नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून अक्षरश: मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. चार महिन्यांपूर्वीच येथील नागरी कृती समितीने १६ फेब्रुवारीपासून कचºयाचा एकही ट्रक डेपोवर फिरकू देणार नाही, असा इशारा दिला होता. या इशाºयाकडे महापालिकेने गांर्भीयाने बघीतले नाही. चीन दौरा, मुंबई दौरा करण्यातच प्रश्न मग्न होते. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी ठोस असा निर्णयच घेण्यात आला नाही. दररोज चालढकल करण्याचे काम प्रशासनाने केले.बाभूळगावात रुतले ‘काटे’चितेगाव/औरंगाबाद : शहरापासून २१ किलोमिटर लांब असलेल्या पैठण रोडवरील बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेत शुक्रवारी मनपाने २० ट्रक कचरा टाकला. दुसºया टप्प्यात मनपाच्या गाड्या नवनिर्वाचित कचरा डेपोवर पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी विरोधाचे ‘काटे’मनपाला टोचले. आ. संदीपान भूमरे यांच्यासह नागरिकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना विनंती केली की, कचरा येथे अजिबात टाकू देणार नाही. त्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल...!महापालिकेने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांचे प्रस्ताव मागविले होते. ७५० रुपये प्रति मेट्रीक टन दराने ग्रीन इंडिया कंपनीने तयारी दर्शविली. तातडीने गुरूवारी सर्वसाधारण सभेत या कामाला मंजूरी देण्यात आली. ठराव मंजूर होताच शुक्रवारी सकाळी ७ वाजता पैठण रोडवर बाभूळगाव शिवारात कंपनीच्या गट. क्र. ३७ मध्ये कचरा नेवून टाकण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी या कामाचा नारळ फोडून शुभारंभ केला. एकूण २० कचºयाच्या गाड्या रिकाम्या करण्यात आल्या. मनपाचे पदाधिकारी, अधिकारी आनंदाने शहरात परतले. सकाळी ११ वाजता मनपाच्या गाड्या परत कचरा टाकण्यासाठी गेल्या असता बाभूळगाव, चितेगाव, पैठणखेडा, म्हारोळा येथील ग्रामस्थांनी विरोधप्रदर्शन सुरू केले. घटनास्थळी त्वरीत आ. संदीपान भूमरेही दाखल झाले. बाभूळगावातही विरोध सुरू झाल्याची वार्ता कळताच महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन त्वरीत तेथे दाखल झाले. त्यांनी एक महिना तरी कचरा टाकण्याची मुभा द्यावी अशी विनंती आ. भूमरे आणि ग्रामस्थांना केली. भूमरे यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले की, महापौरसाहेब शहराची ही घाण आमच्या गावात नको म्हणजे नको...यावर महापौरही निरुत्तर झाले. यावेळी चितेगाव जि.प.सदस्य अक्षय जायभाये, माजी उपसभापती कृष्णा गिधाने, म्हारोळा सरपंच रावसाहेब बर्फे, बाभूळगावचे सरपंच रोहीदास दुबीले, पैठणखेडाचे सरपंच अशोक ढगे, मोहन घुंगारडे, संजय घुंगारडे, ज्ञानेश्वर राघुडे, विजु फांदाडे, राहीदास दुबीले, सखाराम राघुडे आदींची उपस्थिती होती. बीडकीनचे सहायक उपनिरिक्षक पंडीत सोनवणे, दिपक देशमुख यांनी पोलीस बंदोबस्तात मनपाची वाहने गावाबाहेर काढून दिली.फसवणूक करून एनओसी घेतली...ग्रीन इंडिया कंपनीच्या कंत्राटदाराने बाभूळगाव ग्रामपंचायतीला गांढूळ खत निमिर्तीसाठी एनओसी मागितली. त्यानुसार त्यांना एनओसी देण्यात आली. औरंगाबाद महापालिकेचा कचरा आणून त्यावर प्रक्रिया करणार असे त्याने सांगितले नाही. फसवणूक करून ग्रामपंचायतीची एनओसी घेतल्याचा आरोप रोहीदास दुबीले यांनी केला.नारेगावात आंदोलन सुरूऔरंगाबाद : नारेगाव परिसरातील आठ ते दहा गावच्या शेतकºयांनी एकत्र येऊन कचरा डेपो हटावसाठी शुक्रवारपासून जोरदार आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या भीतीने महापालिकेचे एकही वाहन कचरा डेपोकडे फिरकले नाही. पर्यायी जागेच्या शोधार्थ महापालिकेच्या अधिकाºयांची व पदाधिकाºयांची ‘भागमभाग’सुरू होती. वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केल्यानंतरही सायंकाळपर्यंत मनपाला यश आले नव्हते.नारेगाव, मांडकी, गोपाळपूर आदी शिवारातील ग्रामस्थांनी चार महिन्यांपूर्वीच मनपाला १६ फेब्रुवारीपासून नारेगावला कचरा टाकू देणार नाही, असा इशारा दिला होता. चार महिने निव्वळ टाईमपास केला. कचºयासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था मनपाला करता आली नाही. शुक्रवारी सकाळी ६ वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांनी नारेगाव कचरा डेपोला भेट दिली. यावेळी कोणीही आंदोलक तेथे दिसून आले नाहीत. त्यानंतर सकाळी ८ वाजेपासून नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली.मागील तीन दशकांपासून मनपाने टाकलेल्या कचºयावर प्रक्रिया करावी, दररोज जमा होणारा कचरा यापुढे अजिबात येऊ देणार नाही आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले. या भागातील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद केल्याचे हमीपत्र मनपाने दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही व मुदतही देण्यात येणार नसल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले. या आंदोलनात पुंडलिक अंभोरे, डॉ. विजय डक, भाऊसाहेब गायके, मनोज गायके, संजय दांडगे, विष्णू भेसर, भाऊसाहेब चौथर, नंदकुमार डक, डॉ. दिलावर बेग, रखमाजी गायके, शंकर भेसर, पोपटसिंग पोलवाल, रावसाहेब अंभोरे, संजय डक, प्रमोद चक्कर, अकबर शाह, मोईनोद्दीन, पिरखा शाह, कुसुमबाई झंझाडे, सुलाबाई वडेकर, मंडाबाई झंझाडे, आशाबाई हिरडे, सुबीधरबाई गायके, चागुना लबडे आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.मिटमिट्यातही विरोधबाभूळगाव येथील प्रयोग फसल्यानंतर दुपारी दोन वाजता महापालिकेने मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेवर मोर्चा वळविला. कचºयाच्या गाड्या या भागात येताच नागरिकांनी तेथेही विरोध सुरू केला. सफारी पार्कची जागा मनपाची असतानाही तेथे कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केला. येथूनही वाहने परत आणावी लागली.साताºयातील जागा विकत घ्यासातारा येथील एका व्यक्तीची दोनशे एकर जागा आहे. त्याला महापौर नंदकुमार घोडेले यांनी चर्चेसाठी बोलावले. एक महिना तरी तूमच्या जागेवर कचरा टाकू द्या अशी विनंती केली. त्यांनी २५ लाख रुपये एकरने जागा विकत घ्या, असा सल्ला महापौरांना दिला. जागेसाठी शासनाकडून मी निधी आणतो असेही जमीन मालकाने सांगितले.