शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

"मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल!

By मुजीब देवणीकर | Published: September 02, 2024 8:22 PM

अठरा पगड जातींसाठी केंद्राची योजना असल्याची अफवा; महापालिकेच्या प्रकल्प विभागात शिलाई मशीन मिळणार या आशेने हजारो महिला अर्ज भरण्यास गर्दी करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या योजनेत १८ पगड जातीच्या नागरिकांना आपला पारंपारिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी कर्जही देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले. शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या महिलांचे लोंढे महापालिकेत दाखल होत आहेत. शिलाई मशीन द्या, अशा आशयाचे तब्बल २० हजार अर्ज प्राप्त झाल्याने महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही अवाक झाले. मोफत शिलाई मशीन मिळणार ही अफवा कोणीतरी पसरवली. ४०० ते ५०० रुपये प्रत्येकी खर्च करून महिला अर्ज भरत आहेत.

महापालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी केंद्र, राज्य शासनाच्या योजना याच विभागामार्फत सुरू आहेत. कोरोनानंतर हातगाडीवर साहित्य विक्रेत्यांना १० ते ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले. त्याच पद्धतीने दुसरी योजना केंद्राने आणली आहे. या योजनेत १८ पगड जातींच्या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना अगोदर डीआयसीमार्फत प्रशिक्षण दिले जाईल. दररोज ५०० रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जाईल. दुसरे प्रशिक्षण १५ दिवसांचे राहील. त्यातही ५०० रुपये भत्ता राहील. व्यवसाय करण्यासाठी किट दिले जाणार आहे. या शिवाय १ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के व्याजाने कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाची परतफेड केल्यास २ लाख रुपये दुसरे कर्ज मिळेल. महापालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जांची शहानिशा करावी, तपासणी करावी आणि मंजुरीसाठी पुढे सादर करावेत.

१८ पगड जाती कोणत्या?कुंभार, सुतार, लोहार, चांभार, माळी, तेली, न्हावी, परीट-धोबी, बोट बनविणारा, शस्त्र कारागिर, कुलूप तयार करणारा-दुरुस्ती करणारा, सोनार, शिल्पकार-दगड कोरणारा, गवंडी, बास्केट-चटई-झाडू बनविणारा-कॉयर विणकर, बाहुली-खेळणी बनविणारा, शिंपी, मासे पकडायचे जाळे बनविणारा.

शिंपी प्रवर्गात अर्जशिंपी प्रवर्गात महापालिकेकडे २० हजार अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जावर मोफत शिलाई मशीन द्यावी, असा उल्लेख महिलांनी केला आहे. अन्य प्रवर्गात ५ हजार अर्ज आले आहेत. मुळात योजनेत शिलाई मशीन देण्याचा कुठेच उल्लेख नाही.

पुण्याहून आली महिलाछत्रपती संभाजीनगर शहरात राहणारी आणि पुणे येथे सासर असलेली एक महिला शुक्रवारी सकाळी महापालिकेत दाखल झाली. खास अर्ज भरण्यासाठी पुण्याहून आल्याचे तिने सांगितले.

अफवा कोणी पसरवली माहीत नाहीमहापालिकेच्या प्रकल्प विभागात अर्ज केल्यानंतर शिलाई मशीन मिळणार ही अफवा कोणी पसरविली माहीत नाही. दररोज हजारो महिला अर्ज दाखल करीत आहेत. महिलांना रोखण्यासाठी अनेकदा सुरक्षा रक्षक तैनात करावे लागत आहेत.- अंकुश पांढरे, उपायुक्त मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका