शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भिडेंना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा

By स. सो. खंडाळकर | Published: July 31, 2023 8:03 PM

दि. १ ऑगस्ट रोजी सिडकोतील अग्रसेन भवनात भिडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही, असा स्पष्ट इशारा स्थानिक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांना तसे निवेदनच सोमवारी दुपारी सादर करण्यात आले.

मंगळवार, दि. १ ऑगस्ट रोजी सिडकोतील अग्रसेन भवनात भिडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. अलीकडेच भिडे यांनी महात्मा फुले, पेरियार रामस्वामी नायकर, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू व साईबाबा यांच्याविषयी तसेच स्वातंत्र्य दिन, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाविषयीही अनुद्गार काढले होते.भिडे यांच्या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकात निदर्शनेही करण्यात आली. संभाजी भिडे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. भिडे यांना अटक न होता ते राज्यात मोकाट फिरत आहेत. त्यांचा बोलविता धनी कोणी तरी वेगळाच असून, त्यांना राज्यात, देशात जातीय सलोखा, सामाजिक सलोखा संपवून जाती-धर्मात दंगली घडवून आणायच्या आहेत, असा स्पष्ट आरोप पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना महाविकास आघाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबापू औताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, अभिषेक देशमुख, भीमशक्तीचे दिनकर ओंकार, डॉ. अरुण शिरसाठ, किरण पाटील डोणगावकर, डॉ. नीलेश अंबेवाडीकर, संतोष भिंगारे, संदीप बोरसे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAurangabadऔरंगाबाद