- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मात्र, सध्या धावणाऱ्या रेल्वे विशेष रेल्वे म्हणूनच धावत आहेत. त्यामुळे तिकिटांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यातही दक्षिण भारतातून येणाऱ्या काही रेल्वेंनाच जनरल तिकीट, त्याबरोबरच दिव्यांग, ज्येष्ठांना तिकिटात सवलत देण्यात येते. मात्र, काही एक्स्प्रेससाठी जनरल बोगी आणि जनरल तिकिटाची सुविधा दिली नसल्याने लूट होत असल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे. (will Express railway attached general coaches on Diwali or not ?)
औरंगाबाद - हैदराबाद आणि हैदराबाद - औरंगाबाद या दोन्ही विशेष रेल्वेंमध्ये मंगळवारपासून डीएल-१ आणि डीएल-२ या दोन्ही बोगी प्रवाशांसाठी अनारक्षित उपलब्ध करून देण्यात आल्या. नरसासापूर - नगरसोल (०७२३१), औरंगाबाद - रेणीगुंठा या विशेष रेल्वेत दोन बोगी २७ ऑगस्टपासून, तर नगरसोल - नरसापूर (०७२३२), रेणीगुंठा - औरंगाबाद या विशेष रेल्वेतील दोन बोगी २८ ऑगस्टपासून अनारक्षित झाल्या आहेत. नरसापूर - नगरसोल (०२७१३) आणि नगरसोल - नरसापूर (०२७१४) या दोन्ही रेल्वेंत अनुक्रमे २८ आणि २९ ऑगस्टपासून २ बोगी प्रवाशांसाठी अनारक्षित उपलब्ध झाल्या आहेत. याबरोबरच नांदेड - औरंगाबाद विशेष रेल्वेत २७ ऑगस्टपासून आणि औरंगाबाद - नांदेड विशेष रेल्वेत ३० ऑगस्टपासून ४ बोगी अनारक्षित करण्यात आल्या. इतर रेल्वेंना अनारक्षित बोगी आणि अनारक्षित तिकिटाची सुविधा कधी देणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
स्पेशल तिकिटाची खिशाला कात्रीस्पेशल रेल्वेत प्रवासासाठी दुप्पट, तिप्पट तिकीट दर आहे. मराठवाड्यातील प्रवाशांची गैरसोय आणि दक्षिण भारतातील प्रवाशांची सुविधा, अशी अवस्था द.म. रेल्वेकडून केली जात आहे, असे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले.
काही सांगता येणार नाहीपॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. त्यामुळे याविषयी काही बोलता येणार नाही, असे रेल्वेस्टेशनवरील अधिकारी म्हणाले.
पॅसेंजर रुळावर कधी येणार?नांदेड - नगरसोल पॅसेंजर, नगरसोल - काचिगुडा पॅसेंजर, पुणे - निजामाबाद पॅसेंजर, दौंड - नांदेड पॅसेंजर, जालना - नगरसोल डेमू या रेल्वे बंदच आहेत. अप-डाऊन करणाऱ्यांची गैरसोय सुरूच आहे.
तिप्पट प्रवास भाडेस्पेशल रेल्वेतून प्रवास करण्यासाठी १० रुपयांऐवजी आता ३० रुपये मोजण्याची वेळ येत आहे. स्पेशल रेल्वे बंद करून नियमित रेल्वे सुरू कराव्यात.- अक्षय वायकोस
जनरल तिकीट द्यावेनंदीग्राम, तपोवन, देवगिरी, जनशताब्दी, मराठवाडा एक्स्प्रेसला जनरल तिकिटाची सुविधा द्यावी. केवळ दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी धावणाऱ्या रेल्वेत जनरल तिकीट देण्यात आले.- शंकर कवडे