वाळूज महानगर : लोकमतने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या एमआयडीसी प्रशासनाने वाळूज उद्योगनगरीतील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. बुधवारी परिसरात पाहणी करुन संबंधितांना अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह शेकडो अतिक्रमणे जमिनदोस्त केली. तर अनेकांनी स्वत:हून अतिक्रण काढून घेतले होते. त्यामुळे उद्योगनगरीतील मुख्य चौकासह रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहीम थंडावल्याने उद्योगनगरीत पुन्हा अतिक्रमण वाढले.
येथील कामगार चौकासह एफडीसी चौक, एनआरबी चौक, रांजणगाव फाटा, महाराणा प्रताप चौक, मोरे चौक आदी मुख्य चौकासह अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. याबाबत लोकमतने १६ डिसेंबर रोजीच्या अंकात ‘वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमण जैसे थे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखत घेत एमआयडीसी प्रशासनाने उद्योग नगरीतील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. एमआयडीसीच्या पथकाने बुधवारी कामगार चौक, महाराणा प्रताप चौक, रांजणगाव फाटा, एनआरबी चौक, जोगेश्वरी आदी भागात पाहणी करुन संबंधितांना तात्काळ अतिक्रमण काढून घेण्याच्या सचूना संबंधितांना केल्या आहेत.
प्रत्यक्ष कारवाईकडे लक्षअधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे एमआयडीसीचे अनेक भूखंड धनदांडग्या लोकांनी गिळंकृत केले आहेत. लोकमच्या वृत्ताची दखल घेवून एमआयडीसीने संबंधितांना अतिक्रमण काढून घेण्याची ताकीद दिली आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाई कधी होते, याकडे उद्योजकांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे.
यासंदर्भात एमआयडीसीचे उप अभियंता सुधीर सुत्रावे म्हणाले की, नुकसान होवू नये म्हणून संबंधितांनी अतिक्रमण काढून घेण्याची ताकिद दिली आहे. समज देवूनही सदरील अतिक्रमण काढून घेतले गेले नाही तर ४-५ दिवसांत कारवाई हाती घेण्यात येणार आहे.