शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

स्थास्वसंस्थेतील प्रशासकराज संपणार की जनगणना सुरू होताच निवडणूक पुन्हा लांबणीवर?

By विकास राऊत | Updated: November 30, 2024 13:05 IST

साडेचार वर्षांपासून सर्व काही ‘जैसे थे’ : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वेध

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तब्बल ५२ नगरपरिषद - नगरपंचायतींवर साडेचार वर्षांपासून प्रशासकराज आहे. यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या गुडघ्याचे बाशिंग गळून गेले. आता विधानसभा निवडणुकांनंतर सर्व पक्षांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

मार्च-एप्रिल २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कचाट्यात निवडणुका अडकल्यानंतर पुढे सामाजिक आरक्षणाच्या कचाट्यात आल्या. मागील दोन वर्षांतील राजकीय परिस्थितीमुळे जे इच्छुक होते, त्यांचेही डोके चक्रावून गेले. कुणाचा झेंडा घ्यावा हाती, या संभ्रमात कार्यकर्ते होते. मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक म्हणून काम बघत आहेत.

मराठवाड्यात सध्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व नांदेड-वाघाळा या मनपा असून यावर प्रशासक आहेत तसेच आठही जि. प.च्या निवडणुका अद्याप झालेल्या असून मुख्य कार्यकारी अधिकारीच प्रशासक आहेत. जालना नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाले आहे. ज्यावेळी निवडणुका घेण्याचा निर्णय होईल, त्यावेळी जालना मनपा असेल.

प्रशासकराज असलेल्या नगरपरिषदा...छत्रपती संभाजीनगर : कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्रीजालना : अंबड, भोकरदन, परतूरपरभणी : गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठहिंगोली : वसमत, हिंगोली, कळमनुरीबीड : बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी-वैद्यनाथ, गेवराई, धारूरनांदेड : अर्धापूर, माहूर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, किनवटधाराशिव : धाराशिव, भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूरलातूर : उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा,

कोरोनानंतर नेमके काय?कोरोनाच्या दोन्ही लाटांनंतर निवडणुका होतील, अशी शक्यता होती. परंतु सामाजिक आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणुका लांबत गेल्या. पुढे जून २०२२ मध्ये राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे निवडणुकांचा मुद्दा मागे पडला. त्यानंतर पुन्हा जुलै २०२३ मध्ये दुसरा राजकीय भूकंप झाला. २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामुळे आता राज्यात ज्या ठिकाणी मनपा, जि.प, न.प. वर प्रशासक आहेत तेथे निवडणुका होतील, असे इच्छुकांना वाटते.

जनगणना सुरू झाली तर पुन्हा लांबणीवर?लोकसभा, विधानसभा निवडणुकीत स्था. स्व. संस्थांमध्ये उमेदवारी देण्याचे इच्छुकांना आश्वासित देऊन प्रचाराला जुंपले. दोन्ही निवडणुकांचे निकाल लागले आहेत. आता कार्यकर्त्यांची पुढील पाच वर्षांपर्यंत काही गरज नाही. स्था. स्व. संस्थेत मर्जीतल्यांना उमेदवारी मिळणार की निष्ठेने काम करणाऱ्यांना; हे आगामी काळात दिसेल. जानेवारी २०२५ पासून पुढे या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी जनगणना सुरू झाली तर या निवडणुका लांबणीवर पडण्याची चर्चा आहे. तसेच आरक्षण, प्रभाग रचना, वॉर्डसंख्या यावरून विविध याचिका न्यायप्रविष्ट आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिका