शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

नॅक न करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रवेश थांबवणार? ३१ मार्चचा पुन्हा अल्टीमेटम

By योगेश पायघन | Updated: February 6, 2023 18:50 IST

उच्च शिक्षण विभागाचा ३१ मार्चचा पुन्हा अल्टिमेटम, विद्यापीठही देणार नाही संलग्नीकरण

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ११५ अनुदानित महाविद्यालयांपैकी १०६ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन पूर्ण केले. उर्वरित ९ महाविद्यालयांनी ३१ मार्चपर्यंत मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील सुरुवातीची संस्था नोंदणी करणे, आयआयक्यूए नॅक कार्यालयास सादर करणे अनिवार्य केले आहे. तसे न केल्यास २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाच्या प्रवेशास निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचा अल्टिमेटम उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संलग्नित ४८० महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, पीएआर करण्याची मुदत देत तसे न करणाऱ्या महाविद्यालयांचे थेट संलग्नीकरण रद्द करण्याची कारवाई किंवा नो ॲडमिशन संवर्गात वर्ग करण्याच्या कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही विना अनुदानित महाविद्यालये उच्च शिक्षण विभाग, विद्यापीठाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत ११५ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी केवळ १०६ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन पूर्ण केले. फेब्रुवारी महिना उजाडला असून, अद्याप ९ महाविद्यालयांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. विशेष म्हणजे नॅक मूल्यांकन पूर्ण करणाऱ्या १४९ महाविद्यालयांपैकी १३ महाविद्यालयांनी मागील दोन महिन्यांत नॅक मूल्यांकन करून घेतले आहे. नॅक न केलेल्या महाविद्यालयांत विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या १५० आहे. उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना ३० जानेवारी रोजी पत्र लिहून पुन्हा अल्टिमेटम दिला असल्याचे सहसंचालक डाॅ. सुरेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

नॅक मूल्यांकन न केलेली अनुदानित ९ महाविद्यालये-राजीव गांधी महाविद्यालय, करमाड-जनता महाविद्यालय, औरंगाबाद-एकता महाविद्यालय, बिडकीन-शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड-चेतना वरिष्ठ कला महाविद्यालय, औरंगाबाद-राजर्षी शाहू महाविद्यालय, वाळूज-गोदावरी महाविद्यालय, अंबड-वैष्णवी महाविद्यालय, वडवणी-एनएसएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बीड

टॅग्स :Educationशिक्षणDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादcollegeमहाविद्यालय