शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

कामात गती येणार का? देवळाई चौक ते शिवाजीनगर रेल्वे फाटकाखाली काम सुरू

By साहेबराव हिवराळे | Published: January 04, 2024 11:40 AM

शिवाजीनगरकडूनही खोदकाम अन् लोखंडी चटई बांधणे हळूहळू सुरू

छत्रपती संभाजीनगर : देवळाई चाैक ते शिवाजीनगर रेल्वे फाटकातून दररोज मार्ग काढताना होणारी अडचण आणखी बरेच दिवस नागरिकांना सहन करावी लागणार आहे. शिवाजीनगर अथवा देवळाईत राहणाऱ्यांना वाहन रुळापलीकडे पार्क करून जीव मुठीत धरून रूळ ओलांडावे लागतात.शिवाजीनगरकडून खोदकाम अन् देवळाईकडून लोखंडी चटई बांधणे सुरू असले तरी कामात अधिक गती येणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

रेल्वे रुळाखाली २५ फूट खोलवर सिमेंटचा बॉक्स बसवून मार्ग मोकळा केला जाणार आहे, येणाऱ्या काळात शाळकरी मुलांच्या बस सुरळीत दुतर्फा जाऊ शकतील, यादृष्टीने कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे; पण आजघडीला बहुतांश नागरिकांना रुळ ओलांडूनच ये- जा करावी लागत आहे. बहुतांश रहिवासी दुचाकी उभी करून ठेवतात अन् रुळ ओलांडतात. सायंकाळी घरी जाताना रेल्वे रुळाजवळ पार्क केलेली दुचाकी घेऊन परततात.

संग्रामनगर पुलावर कोंडी वाढलीया कामामुळे सर्व भार संग्रामनगर उड्डाणपुलावरच आलेला दिसत आहे. याठिकाणीही सर्व्हिस रोडच्या कामाचा खोळंबा अद्याप संपलेला नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा प्रवासी रेल्वे स्टेशन, पैठण रोड आणि झाल्टा फाटा, अशा पद्धतीने प्रवास करीत आहेत.

पुलाच्या कामाची गती हवीअति गंभीरप्रसंगी नागरिकांना दूरवरून फेरा मारून आणि गर्दीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे पालक मंडळी, तसेच नागरिकांची गैरसोय वाढलेली आहे. त्यासाठी कामाची गती वाढवावी, अशी मागणी राजेंद्र राठोड, नीलेश भाग्यवंत, हरिभाऊ राठोड, रोहन पवार आदींनी केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे