शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

यंदा जिल्हा परिषदेच्या योजना मार्गी लागतील? वर्षात दोन निवडणुकांच्या आचारसंहितांचा अडसर

By विजय सरवदे | Published: July 26, 2024 8:10 PM

दीड महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : या आर्थिक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या उपकरातून राबविण्यात येणाऱ्या तसेच शासकीय योजना मार्गी लागतील का, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

जि. प.ने मार्च महिन्यात अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर समाज कल्याण विभागांतर्गत उपकरातून ४ कोटी ३० लाख १२ हजारांच्या, तर दिव्यांगांसाठी १ कोटी १५ लाख ११ हजारांच्या योजना राबविण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये ११९ लाभार्थ्यांना संगणक अथवा लॅपटॉप वितरित करणे, ९२ तरुण व ९२ महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे, ८६ पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्रांचा पुरवठा करणे, ३२२ महिलांना पिको फाॅल मशीन, दुग्ध व्यवसायासाठी १२५ जणांना गाय किंवा म्हशी वाटप करणे, १०० महिलांना मिरची कांडप यंत्रांचा पुरवठा करणे, २०० जणांना शेळी गट वाटप करणे, याशिवाय ४१ दिव्यांगांना विनाअट घरकुल देणे, २५० अतितीव्र निराश्रित दिव्यांगांना १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता वाटप करणे, ३५ अस्थिव्यंगांना स्वयंचलित तीनचाकी सायकल वाटप करण्याचा समावेश आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत या योजना अडकल्यामुळे बहुतांश लाभार्थी १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करू शकले नव्हते. त्यांच्यासाठी आता २५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्जांची छाननी, पात्र-अपात्र अर्जांची निवड, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करणे, या प्रक्रियेसाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाईल. तत्पूर्वी, दीड महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी निवडीची प्रक्रिया पुढे दोन-तीन महिने जाऊ शकते.

विहिरींसाठी दोन वर्षांची मुदतजि. प. कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन’ आणि ‘बिरसा मुंडा कृषिक्रांती’ या दोन योजनांच्या माध्यमातून विहिरींसाठी अनुदान दिले जाते. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून दर तीन महिन्यांमध्ये सोडत पद्धतीने लाभार्थी निश्चित केले जातात. यंदा कृषी स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटी, तर कृषिक्रांती योजनेत साधारणपणे १ कोटी एवढ्या निधीची तरतूद आहे. पात्र, लाभार्थ्यांना विहीर खोदण्यासाठी दोन वर्षांची मुदत असल्याचे जि. प.चे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद