शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'लॉटरी लागली, कर्ज घ्या'; मोबाइलवर अनवाँटेड कॉल्स रोखायचे कसे?

By राम शिनगारे | Published: December 29, 2022 12:39 PM

अनोळखी कॉलला कोणताच प्रतिसाद न देता आपली फसवणूक टाळता येऊ शकते

- राम शिनगारेऔरंगाबाद : मोबाइलवर सतत अनवाँटेड कॉल्सचा मारा सुरू असतो. हे कॉल्स विविध कंपन्या, बँकांची कर्ज घेण्यासाठी असतात. काही कॉल हे फसवणूक करण्यासाठीच केलेले असतात. काही वेळा सूचना देण्यासाठीही कॉल येतात. त्यांना रोखण्यासाठी मोबाइल कंपन्यांकडे ‘डू नॉट डिस्टर्ब ऑफ’ असा मेसेज पाठवावा लागतो. हा मेसेज पाठविल्यानंतरही अनवाँटेड कॉल्स येतच राहतात. ते ग्रुप कॉल असतात. मोबाइलधारक या कॉल्समुळे त्रस्त होऊन जातात. यातून सुटका करून घेण्यासाठी संबंधित कॉलला प्रतिसाद न देणे हेच उत्तम ठरते, असे सायबर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनोळखी नंबरवरूनच होते फसवणूकफसवणूक करण्याच्या उद्देशाने आलेले कॉल अनोळखी नंबरवरून असतात. त्यामुळे अशा कॉलला प्रतिसाद देण्यात येऊ नये. अनेक वेळा परदेशातून, परराज्यातून कॉल येतात. ते आपल्याला काही तरी आमिष दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यास प्रतिसाद दिल्यामुळे आपली फसवणूक होत असते.

कसे रोखाल अनवाँटेड कॉल्स?ऑनलाइनच्या जमान्यात आपण कोणत्याही ठिकाणी खरेदीसाठी गेल्यानंतर संबंधित ठिकाणी मोबाइल नंबर नोंदवून घेतात. त्यासह इतर ठिकाणांहून मोबाइल नंबर जातात. त्यामुळे सायबर हॅकरही आपले मोबाइल क्रमांक मिळवून त्याद्वारे कॉल करीत असतात. त्यांना रोखण्यासाठी प्रतिसाद न देणे हाच उत्तम पर्याय असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

११ महिन्यांत मोबाइलवरून शेकडोंची फसवणूकअनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर काही नवीनच माहिती सांगून, बक्षीस लागल्याची थाप मारून, आपली वीज कट करण्यात येत असल्याचे सांगून, ‘केवायसी’चा बहाणा करून फसवणूक केली जाते. त्यात आपल्याला प्रभावित करून बँक डिटेल्सही घेतले जातात. अशा पद्धतीने चालू वर्षात शेकडो जणांची फसवणूक करण्यात आली आहे.

लाखो रुपये उडविलेऑनलाइन भामट्यांनी सायबर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या शेकडो तक्रारदारांना लाखो रुपयांना गंडवले आहे. प्रत्येक वेळी फसवणुकीची नवा फंडाही वापरण्यात आल्याचे तक्रारींवरून दिसून येते.

तंत्रज्ञानाचा वापर करामोबाइलवर येणाऱ्या अनोळखी कॉलला ओळखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आपल्याकडे सोशल मीडियाचे ॲप असतात, तसेच काही मोबाइल क्रमांक ओळखणारे ॲप आहेत. त्याद्वारे कोणाचा कॉल आला होता, हे तपासता येते. त्याशिवाय अनोळखी कॉलला कोणताच प्रतिसाद न देता आपली फसवणूक टाळता येऊ शकते, असे सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल