शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांचा मार्ग झाला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:19 AM

फुलंब्री विधानसभा मतदार संघात इत्छुकाची मोठी यादी असून यात भाजपची संख्या अधिक आहे हरिभाऊ बागडे कधी थांबतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

-रउफ शेख फुलंब्री( छत्रपती संभाजीनगर):  विधानसभेचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राज्यपाल पदी निवड होताच भाजप इत्छुकाच्या गोटात चलबिचल सुरु झाली रविवारी सकाळ पासून त्यांना भेटण्यासाठी इत्छुकानी रांगा लावलेल्या होत्या पक्षात एक अनार सौ बिमार अशी परिस्थिती असून आमदारकीच्या तिकीटा येणाऱ्या काळात मारामारी पाह्यला मिळण्याची शक्यता आहे  फुलंब्री विधानसभा मतदार संघात इत्छुकाची मोठी यादी असून यात भाजपची संख्या अधिक आहे हरिभाऊ बागडे कधी थांबतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते तो क्षण आता या इत्छुकाच्या हाती आलेला आहे तिकीट आपल्यालाच मिळणार आहे अशे सांगणारे भाजपा मध्ये अनेकजण आहे या इत्छुकानी तर छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री या दोन तालुक्याच्या ठिकाणी आपले स्वंतंत्र संपर्क कार्यालय या पूर्वीच थाटून ठेवलेलं आहे त्यांना हरिभाऊ बागडे याच्या विषयी कुणकुण लागलेली असावी असा कयास लावला जात आहे 

 बागडे नंतर कोण ?

फुलंब्री मतदार संघात भाजपचे नेते म्हटले कि केवळ हरिभाऊ बागडे याचे नाव येते त्यांचीच आता राजकारणातून एक्झिट झाल्याने त्याचा वारसदार कोण राहणार त्याची जागा कोण घेणार हा अजूनतरी अनुतरीत प्रश्न असला तरी या जागेवर कोणाला बसवायचे हा निर्णय हि हरिभाऊ बागडे हेच करतील अशी चर्चा आहे ते राज्यपाल झाले तरी या मतदार संघात त्याचा वारसदार ठरविण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे कि पक्षश्रेष्ठीं कडे आहे हे येणाऱ्या काळात समजून येईल  फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर शहरात अशा दोन ठिकाणी कॉंग्रेस कडून विलास औताडे तर भाजपा कडून विजय औताडे ,संभाजीनगर शहरात  राधाकिसन पठाडे यांनी कार्यालय सुरु केले तर फुलंब्री येथे लवकर उघडणार आहे ,अनुराधा चव्हाण यांचे दोन्ही  ठिकाणी संपर्क कार्लेयालय आहे आणखी काही इत्छुक कार्यालय सुरु करण्याच्या तयारीत आहेत      जालना लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदार संघातून २८ हजार मताचा तोटा झालेला असला तरी विधानसभा निवडणुकीत असे होणार नाही अशी अशा भाजपला आहे त्यामुळे तिकीट मिळाले तर पक्षाचा आमदार होईल असा अहवाल हि भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे 

 या मतदार संघात  हरिभाऊ बागडे हे उमेदार राहिले तर कॉंग्रेस पक्षाला निवडणूक जिंकणे सोपे नाही असे चित्र होतेच पण आता ते उमेदवार नसणार हे पक्के झाल्याने कॉंग्रेस च्या गोटात हि आनंदाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पण याच्यात हि आमदारकी करिता तीन जन दावेदार आहेत तिकीटा करिता रस्सीखेच पाह्यला मिळेल असे दिसून येते 

    हे आहेत भाजपा मधील इच्छुक

अनुराधा चव्हाण ,राधाकिसन पठाडे ,सुहास सिरसाट ,विजय औताडे,रामभाऊ शेळके ,दामुअण्णा नवपुते ,राजेंद्र साबळे,प्रदीप पाटील काँग्रेस मधील इच्छुक

विलास औताडे ,जगन्नाथ काळे,संदीप बोरसे शिवसेना शिंदे गटात

अभिजित देशमुख,किशोर बलांडे राष्ट्रवादी शरद पवार गटातून 

पांडुरंग तांगडे ,राजेंद्र पाथ्रीकर

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपा