शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:03 IST

मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळात डावलण्यात आल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपण लोकनेते असल्याचे दाखवून दिले. शिवाय, माझ्यावर तुमचा विश्वास असेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. विश्वास संपला की मार्ग मोकळा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचक इशाराही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा माझ्यावर विश्वास आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या एकसष्टीनिमित्त येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन आणि नागरी सत्कार सोहळ्यात या मैदानावरील आजवरचा गर्दीचा विक्रम मोडला गेला. जिल्हाभरातून सत्तार समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. सत्तार यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “मी मंत्रिपदावर नसतानादेखील लोकांनी प्रेमापोटी एवढी गर्दी केली आहे. मी सदैव जनतेच्या सेवेत राहणारा माणूस आहे. राजकारणात पुढे काय होईल, ते सांगता येणार नाही. मी काय निर्णय घेणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. काही जण सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांनी आम्हाला विरोध केला, लोकांनी त्यांनाच घरी बसविले,” असा टोला त्यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. यावेळी खा. कल्याण काळे, डॉ. दिनेश परदेशी, माजी आ. सुरेश जेथलिया, कृष्णा पाटील डोणगावकर, राधाकिसन पठाडे, रामूकाका शेळके, बाळासाहेब संचेती, अभिजित देशमुख, सुधाकर सोनवणे, संतोष कोल्हे, अविनाश गलांडे, नंदकिशोर सहारे, भाऊसाहेब ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

शिंदेसेनेचे आमदार अनुपस्थित!जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार आहेत. मात्र, आमदार सत्तार यांच्या नागरी सत्काराला एक जणही उपस्थित नव्हता. उलट भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व इतर पक्षातील नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

मंत्री शिरसाट यांना दिले उत्तर..सिल्लोडमधील गुंडगिरी संपविण्याचा इशारा देणारे मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “सिल्लोडला काय येता? मीच छत्रपती संभाजीनगरमध्ये येतोय. इथली गुंडगिरी कशी थांबवायची ते आधी पाहू. त्यांचे वक्तव्य म्हणजे, नाल्याच्या पाण्याचा खळखळाट आहे. आम्ही समुद्रासम आहोत!”

मी पुन्हा येईन...आमच्या नेत्याने (शिंदेंनी) सर्वांना सांगितले आहे की, अडीच-अडीच वर्ष मंत्रिपद राहील. त्यामुळे मलाही अडीच वर्षे थांबावे लागेल. अडीच वर्षांनंतर काय होईल, मला माहिती नाही. राजकारणात आश्वासन पूर्ण होत नसते. पण, काहीही करून मी पुन्हा येईन!

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर