शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

वाळूज झालर क्षेत्र विकास आराखड्यातून सिडकोचा काढता पाय; चेंडू पुन्हा शासनाच्या काेर्टात

By विकास राऊत | Published: January 24, 2024 7:37 PM

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि नगरविकास विभाग, सिडकोमध्ये झालेल्या बैठकीत गरमागरम चर्चा होऊनही काहीही ठोस निर्णय झाला नाही.

छत्रपती संभाजीनगर : सिडकोने वाळूज प्रकल्पातील महानगर १, २, व ४ च्या भूसंपादनासाठी १२४.४० हेक्टरपैकी आगाऊ भूसंपादन केलेले ७.३६ हेक्टर वगळून उर्वरित ११७.४ हेक्टरच्या भूसंपादन प्रक्रियेतून व २६ गावांसाठीच्या झालर क्षेत्र विकास आराखड्यातून काढता पाय घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांचा निर्णयाचा चेंडू मंगळवारी एका बैठकीत शासनाच्या कोर्टात टोलविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि नगरविकास विभाग, सिडकोमध्ये झालेल्या बैठकीत गरमागरम चर्चा होऊनही काहीही ठोस निर्णय झाला नाही.

वाळूजमधील पूर्ण भूसंपादन करणे सिडकोला शक्य नाही, तर १५ हजार हेक्टरच्या झालर क्षेत्राचे काय करायचे, याचा निर्णय अधांतरीच राहिला. वाळूजमध्ये भूसंपादन करणे सिडकोला शक्य नाही. झालर क्षेत्रात दहा हजार कोटी रुपयांतून पायाभूत सुविधा उभारणे झेपणार नाही. यामुळे सिडकोने या दोन्ही प्रकल्पांना ‘टाटा’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘लोकमत’ने वाळूज महानगर आणि झालर क्षेत्रातून सिडको काढता पाय घेणार असल्याचे वृत्त दि. १९ आणि २० जानेवारीच्या अंकामध्ये प्रकाशित केल्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आमदार प्रकाश सोळुंके, नगरविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, सिडको प्रशासक भुजंग गायकवाड यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठकीत चर्चा झाली. भुमरे यांनी गुप्ता यांना सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना केल्या, तर सावे यांनी वाळूज, झालर क्षेत्रावर चांगला निर्णय होईल, असे सांगितले.

भूसंपादन प्रकरणात न्यायप्रविष्ट असलेल्या याचिकांच्या आधीन राहून सिडकोने वाळूजमधील भूसंपादन प्रकियेतून माघार घेतली आहे. सिडकोने गोलवाडी, वाळूज (बु,), नायगाव, पंढरपूर, तीसगाव, वळदगाव नियोजनातून वगळले आहे. ६९८ कोटींचे शुल्क सिडकोकडे जमा आहे. त्यातून संपादित असलेल्या ७.३६ हेक्टर जागेचा विकास होईल. त्यातील आरक्षणनिहाय भूसंपादन करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र देऊन सिडको रकमेची मागणी करील. काही प्रकरणात न्यायालयाने भूसंपादन करण्याचे आदेश दिलेले आहेत. ते केले नाही तर सिडकोच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

शहर बकाल होऊ देणार नाहीझालर क्षेत्र विकास आराखडा अधांतरी ठेवणे, वाळूजमधील भूसंपादन न करणे. यामुळे अनियोजित बांधकामे होऊन शहर बकाल होण्याची भीती आहे. शासन विकास करण्याबाबत सकारात्मक आहे. धोरणात्मक बाबी म्हणून काही निर्णय घेतले जातात. शहर बकाल होऊ देणार नाही.-असीमकुमार गुप्ता, सचिव नगरविकास विभाग

निर्णय शासन घेईलवाळूजमध्ये ७.३६ हेक्टर जागा सिडकोने घेतली आहे. त्या जागेबाबत सिडको निर्णय घेईल. नव्याने भूसंपादन करण्याबाबत शासनाने काही निर्णय घेतला तर विचार होईल. झालर क्षेत्र विकास आराखड्यातील पायाभूत सुविधा, भूसंपादनाबाबत शासनाकडे सिडकोने दिलेला प्रस्ताव निर्णयाअभावी प्रलंबित आहे. त्यात नवीन काहीही निर्णय नाही.-शंतनू गाेयल, जेएमडी सिडको

आमदार सोळुंके संतापलेवाळूज महानगर विकासप्रकरणी आमदार प्रकाश सोळुंके यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. तेदेखील या बैठकीला उपस्थित होते. सिडकोने भूसंपादनातून माघार का घेतली, याचा सवाल करीत ते बैठकीत संतापले होते. सचिव गुप्ता यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण शांत झाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद