लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात चोºयांचे प्रमाण वाढले असून, दोन महिन्यांत दीडशे चोºया झाल्याने पोलीस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे टाकले आहे. वाढत्या चोºयांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या चोºयांना आळा घालण्याचे काम आता पोलीस प्रशासनाला करावे लागणार आहे.या पावसाळ्यातील सुरुवातीचे दोन महिने पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतातील उभी पिके वाळून जात असताना शेतकरी हवालदिल झाले होते. त्यातच चोºयांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती आखाड्यांवरील चोºया असोत की घरफोड्या दररोज जिल्ह्यात कुठे न कुठे चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाचे नियंत्रण सैल झाल्याचेच दिसत आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही दररोज घरफोडीच्या घटना घडत आहेत. चोºयांची साखळीच तयार होत असताना पोलीस प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.चोरीच्या घटना वाढल्याने प्रशासनाने रात्रीची गस्त वाढविणे अपेक्षित होते. मात्र, गस्त वाढविण्याचे कामही पोलीस प्रशासनाने केले नाही. सण आणि उत्सवांच्या काळात चोºयांची संख्या वाढतेच. त्यासाठी आधीपासूनच नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, पोलीस प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने चोरट्यांचे फावत आहे. परिणामी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे, चोरींच्या घटनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तपासात पोलिसांना अपयश येत असून, अद्याप एकाही चोरीचा उलगडा पोलिसांनी केलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा चोरट्यांवरील धाक संपल्याने या घटना घडत असल्याची चर्चा आहे.
दोन महिन्यांत दीडशे चोºया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:55 PM