औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या ‘मूल्यांकना’त ‘अ’ दर्जा कायम राखत सुधारणा नोंदवली होती. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’मधील (एनआयआरएफ) विद्यापीठ गटात विद्यापीठाने मोठी झेप घेत ८५ वा क्रमांक पटकावला. मागील वर्षी विद्यापीठाचा समावेश १०१ ते १५० यात झालेला होता.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१६ पासून देशभरातील शैक्षणिक संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यासाठी ‘एनआयआरएफ’ संकल्पना अस्तित्वात आणली. यामध्ये एकूण सर्व शैक्षणिक संस्थांची एकत्रित यादी जाहीर केली जाते. यानंतर विद्यापीठ, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, विधि, महाविद्यालय, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र आणि वैद्यकीय या गटातील संस्थांची स्वतंत्र यादी जाहीर केली जाते. विद्यापीठ गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे. देशातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळवितानाच १०१ ते १५० यातून ८५ क्रमांकावर प्रगती केली आहे. राज्य विद्यापीठांमध्ये पहिल्या १०० मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १० व्या आणि मुंबई विद्यापीठ ८१ व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचाच क्रमांक लागत असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याशिवाय या गटात महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीचा १५ क्रमांक, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट १७, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेस ३५ , डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ४६, सिंबॉयसिस इंटरनॅशनल ५६, भारती विद्यापीठ ६२, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने ८८ वा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत जाहीर झालेल्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातर्फे ‘एनआयआरएफ’चे समन्वयक डॉ. गुलाब खेडकर उपस्थित होते. या यादीमध्ये राज्य विद्यापीठातील कोल्हापूर विद्यापीठाने १०१ ते १५० या गटात स्थान मिळविले आहे, तर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि जळगाव येथील बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाचा क्रमांक १५० ते २०० या गटात स्थान मिळाले आहे. उर्वरित नांदेड, अमरावती, गडचिरोली, लोणेरे येथील विद्यापीठांचा २०० मध्येही समावेश नसल्याचे प्रसिद्ध झालेल्या यादीतून स्पष्ट झाले.चौकट,शैक्षणिक संस्थांमध्ये १०० च्या बाहेरडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला विद्यापीठ या गटात देशात ८५ वा क्रमांक मिळाला असताना देशातील शैक्षणिक संस्था गटात मात्र १०१ ते १५० या गटात स्थान मिळाले आहे. पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थात राज्य विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १७ वा क्रमांक पटकावला, तर मुंबई विद्यापीठाला १०१ ते १५० या गटातच स्थान मिळाले. इतर विद्यापीठांचा या गटातही समावेश नाही.कोट,- विद्यापीठाने ‘एनआयआरएफ’मध्ये मोठी मजल मारली आहे. मुंबई, पुण्यातील नामांकित विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ खूप पुढे आहे. मराठवाड्यातील मेहनत करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमुळेच ही रँकिंग मिळाली आहे.- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू (पासपोर्ट फोटो)---------------- विद्यापीठातील प्राध्यापकांनी ‘नॅक’च्या धर्तीवरच ‘एनआयएफआर’ रँकिंगसाठी डाटा पाठविण्यासाठी मेहनत घेतली. या मेहनतीचे फलित विद्यापीठाने १०१ ते १५० या गटातून पहिल्या १०० मध्ये झेप घेतली आहे. राज्यात आपल्या विद्यापीठाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू
‘एनआयआरएफ’मध्ये विद्यापीठ शंभरच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:02 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या ‘मूल्यांकना’त ‘अ’ दर्जा कायम राखत सुधारणा नोंदवली होती. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी
ठळक मुद्देसुधारणा : विद्यापीठ गटात मिळाला ८५ वा क्रमांक; मागील वर्षी होता १०१ ते १५० मध्ये समावेश