रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोकाट कुत्रे
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्मवर सध्या मोकाट कुत्रे पहायला मिळत आहेत. एक दोन नव्हे, तर मोकाट कुत्र्यांची झुंड दिसत आहे. हे कुत्रे प्रवाशांच्या अंगावर धावून जातात. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सचखंड एक्स्प्रेस अंशत: रद्द
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सचखंड विशेष एक्स्प्रेस अंशत: रद्द होणे सुरूच आहे. नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २८ डिसेंबर राेजी नवी दिल्ली ते अमृतसरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस ३० डिसेंबर रोजी अमृतसर- नवी दिल्लीदरम्यान रद्द करण्यात आली आहे
औरंगपुरा रस्त्यावरील खड्डे बुजवा
औरंगाबाद : औरंगपुरा ते नारळीबाग रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. परंतु, हे खड्डे बुजविण्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या वळणावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खोकडपुरा रस्त्यावर पसरली खडी
औरंगाबाद : सिल्लेखाना चौक ते खोकडपुरा रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. परंतु, यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली आहे. खडीमुळे दुचाकी घसरण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खडी हटविण्याची मागणी होत आहे.