वाळूज महानगर : शासनाने हुंडासारख्या प्रथावर बंदी घातली आहे. पण अजूनही अनेक महिला याला बळी पडून अन्याय-अत्याचार निमुटपणे सहन करीत आहेत. कायद्याचे ज्ञान घेवून या अन्यायाला महिलांनी वाचा फोडावी, असे आवाहन औरंगाबादच्या न्यायाधिश पौर्णिमा कर्णिक यांनी शनिवारी वाळूज महानगरात केले.
सक्षम फाऊंडेशनतर्र्फे येथील रंगालाल बाहेती अंध मुलींच्या व्यवसाय-पुनर्वसन व प्रशिक्षण केंद्रात महिलांसाठी कायदे व दंडविधानातील तरतुदी यावर आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी अॅड. पौर्णिमा साखरे, अॅड. स्वप्नील पटेल, सक्षम फाऊंडेशनच्या अध्यक्ष मयुरी कांबळे, अपेक्षा सूर्यवंशी, अरुणा कोचरे, सीए रोहन आंचलिया, राजीव जोशी, पद्मावती तापडिया, सुरेखा शिंदे, सोपानराव वडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायाधिश कर्णिक म्हणाल्या की, महिलांनी अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी संगटना करणे महत्वाचे आहे. महिलांनी कायदेविषयक ज्ञान मिळवून अशा घटनावर अंकुश ठेवावा. तरच अशा घटना थांबतील. इतर मान्यवरांनीही महिलांना कायदेविषयक बाबींची माहिती सांगितली.
सूत्रसंचालन कविता तायडे व दैवशाला वाघ यांनी केले. तर मयुरी कांबळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सरला गायकवाड, मनिषा नळगे, शीतल रांजणे, शोभा बोकील, अनिता नरवडे, शकुंतला निकुंभ, मेहश काथार, परिक्षित जावळे, कल्पना वाघमारे, रेखा सूर्यवंशी,रघुनाथ बारड, ज्ञानेश्वर वडकर, सिंधुबाई गाडे, मनिषा ढवळे, ज्योती जाधव, शिला थोरात आदींनी परिश्रम घेतले.