शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा जन्मदर कमी, पण जास्त कोण जगतो; पुरुष की स्त्री?

By मुजीब देवणीकर | Published: December 09, 2022 3:41 PM

औरंगाबाद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा महिन्यांत एकूण ७ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : पुरुषांच्या तुलनेत अलीकडे महिलांचा जन्मदर कमी झाला आहे. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. औरंगाबाद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा महिन्यांत एकूण ७ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला. त्यात ४ हजार ५६५ पुरुष, तर २ हजार ६२१ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास पन्नास टक्केच आहे. या मागची नेमकी कारणे तरी काय आहेत?

साडेचार हजार पुरुष, अडीच हजार महिलांचा मृत्यूमागील दहा महिन्यांच्या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येते की, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते याची वेगवेगळी कारणे असू शकतात. बदलत असलेली जीवनशैली, ताणतणाव, पुरुषांचे कष्ट आदी गोष्टींमुळे पुरुषांचे आयुष्य कमी झाले, असे म्हणता येईल.

पुरुष मृत्यूची अनेक कारणेपुरुषांच्या मृत्यूची अनेक कारणे असतात. विविध आजार, ताणतणाव, व्यसन आदी कारणांमुळे मृत्यू जास्त असू शकतात. पुरुष आपल्या शरीराची कमी काळजी घेतात.- डॉ. वर्षा सातपुते, निसर्गोपचार तज्ज्ञ

महिलांची सहनशक्ती जास्तनिसर्गाने पुरुषांच्या तुलनेत महिलांना ताणतणाव, काम आदी बाबींची सहनशक्ती जास्त दिली आहे. पुरुषांमध्ये ‘स्ट्रेस’ सहन करण्याची क्षमता कमी असते. खाण्या-पिण्याच्या बाबतीतही अनेकदा पुरुष दुर्लक्ष करतात. त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेह, रक्तदाब आदी आजार असले तरी योग्य उपचार घेतले पाहिजेत.- डॉ. स्नेहा गडप्पा, स्त्री रोग तज्ज्ञ

मृत्यूची आकडेवारी काय सांगते?महिना- पुरुष- महिलाजानेवारी- ४८९ -२७९फेब्रुवारी- ५३९-२७२मार्च- ४९५-२७७एप्रिल- ३९८-२२४मे- ४२३-२३१जून- ३८९- २१४जुलै- ३६७-२४१ऑगस्ट-५०५-२८८सप्टेंबर- ५३७- ३०७ऑक्टोबर- ४२३-२८८एकूण-४,५६५-२,६२१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य