छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या क्रांतीचौक पाेलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी शुभांगी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षकपदाचा पदभार रेखा लोंढे यांना देण्यात आला आहे. या बदल्यांनंतर आता आयुक्तालयात ५ पोलिस ठाण्यांचा पदभार महिला अधिकारी सांभाळणार आहेत. यापूर्वी सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी गीता बागवडे तर वेदांतनगरच्या निरीक्षकपदी प्रवीणा यादव यांना पदभार देण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या राज्यस्तरीय बदल्यानंतर शहरातील वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांची यादी बुधवारी जारी झाली. एकाच वेळी सहा महत्त्वाच्या निरीक्षकांची नागपूर व अन्य ठिकाणी बदली झाल्याने अनेक ठाण्यांचे निरीक्षक पद रिक्त झाले होते. दरम्यान, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.
कोण - कोठून- काेठे (पोलिस ठाणे)
शुभांगी देशमुख- नागपूर शहर-क्रांतीचौकरेखा लोंढे-अमरावती शहर-बेगमपुरासुनीता मिसाळ-बेगमपुरा-हर्सूलजनार्दन साळुंके-विशेष शाखा-दौलताबादराजेंद्र होळकर-क्रांतीचौक-छावणीकृष्णचंद्रा शिंदे-नागपूर शहर-विशेष शाखागणेश ताठे-एम वाळूज - छावणी वाहतूक शाखा