शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण दाबत राहू नका,मदतीला कोणी येणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 6:29 PM

प्रवासी वाहनांत ‘पॅनिक बटण’ची सुरक्षा यंत्रणा केवळ नावालाच

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : महिलांनो, तुम्ही जर प्रवासी वाहनातून प्रवास करीत असाल आणि जर तुम्हाला असुरक्षित वाटल्यास वाहनातील ‘पॅनिक बटण’ दाबत राहू नका. कारण तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही. ही यंत्रणा केवळ नावालाच आहे. त्यामुळे एक तर तुमची सुरक्षा तुम्हीच करा, इतरांची मदत मिळते का पहा, नाही तर तत्काळ पोलिसांना फोन करा. प्रवासी वाहनांत ‘पॅनिक बटण’ची सुरक्षा यंत्रणा केवळ नावालाच आहे.

प्रवाशांची, विशेषत: महिलांची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांमध्ये व्हीटीएस किंवा जीपीएस आणि पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली. या निर्णयाची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली. वाहनातून प्रवास करता ‘पॅनिक बटण’ दाबल्यानंतर मदत मिळते का, यासंदर्भात ‘रिॲलिटी चेक’ करण्यात आला. आकाशवाणी ते उस्मानपुरा भागात प्रवाशांकडून चारचाकी वाहनातून जाताना पॅनिक बटण वारंवार दाबण्यात आले; परंतु कोणीही मदतीसाठी आले नाही. यासंदर्भात संबंधित चारचाकी चालकास विचारले असता, ते बसविणे बंधनकारक आहे म्हणून बसविले, असे तो म्हणाला.

पॅनिक बटण, पण कंट्रोल रूमच नाहीयाविषयी आरटीओ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, पॅनिक बटण दाबल्यानंतर त्याची माहिती कोणाला जाईल, याची यंत्रणाच अद्याप बनलेलीच नसल्याचे समोर आले. पॅनिक बटणसंदर्भातील कंट्रोल रूम पोलिसांच्या यंत्रणेशी जोडणार की अन्य कुठल्या यंत्रणेशी जोडणार, हे अजून निश्चितच नाही.

पॅनिक बटण म्हणजे?प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटू लागल्यास किंवा सहप्रवासी किंवा गाडीच्या चालकाकडून गैरकृत्य केले गेल्यास मदत मागण्यासाठी ‘पॅनिक बटण’ वापरता येणार आहे. बटण दाबल्यानंतर संबंधित कंट्रोल रूमला माहिती मिळेल. तसेच, ‘व्हीटीएस’द्वारे ‘लोकेशन’देखील समजेल, असे सांगण्यात येते.

प्रवासात असुरक्षित वाटल्यास काय कराल?प्रवासात असुरक्षित वाटल्यास ११२ या क्रमांकावरून पोलिसांची मदत घेता येईल. त्याबरोबर कुटुंबातील सदस्यांनाही संपर्क साधून माहिती देता येईल. वाहन जर थांबत नसेल तर रस्त्यावरील इतर वाहनचालक, पादचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करावा.

पॅनिक बटण बंधनकारककायद्याप्रमाणे प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविणे बंधनकारक आहे; परंतु त्याची यंत्रणा विकसित झालेली नाही. त्यावर कार्यवाही सुरू आहे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद