शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

पाणी टंचाईमुळे त्रस्त रणरागिणींनी ग्रामपंचायतीच्या टेबल, खुर्च्या फेकल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:51 AM

ग्रामसेवकासह पदाधिकारी उपस्थित नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांसह नागरिकांनी फर्निचर रस्त्यावर फेकले

ठळक मुद्दे पदाधिकाऱ्यांना धरले धारेवरउन्हाळा संपला तरीही पाण्याची बोंब

नागद (औरंगाबाद ) : पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी थेट नागद ग्रुप ग्रामपंचायत गाठली. मात्र, येथे ग्रामसेवकासह पदाधिकारी उपस्थित नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांसह नागरिकांनी येथील फर्निचर रस्त्यावर फेकून आपला रोष व्यक्त केला. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

कन्नड तालुक्यातील नागद ग्रुप ग्रामपंचायत पिण्याचे पाणी पुरविण्यास असमर्थ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी नागद येथील बसस्थानक भाग, मटवाडी, प्रेमनगर, सदाशिववाडी, आंबेडकरनगर, बजरंग चौक येथील नागरिकांसह महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, येथे सरपंच, उपसरपंचासह ग्रामविस्तार अधिकारी ग्रा.पं. सदस्य कुणीही उपस्थित नव्हते. यामुळे ग्रामस्थांचा पारा अधिकच चढला. संतापलेल्या शेकडो महिलांसह नागरिकांनी सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांना फोन केला. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रवेश करून येथील फर्निचरसह खुर्च्या बाहेर फेकून आपला संताप व्यक्त केला. 

माहिती मिळताच सरपंच सीताबाई सोनवणे यांनी कार्यालय गाठले. यावेळी त्यांना घेराव घालून ग्रामस्थांनी पाणीटंचाईबाबत जाब विचारला. गडदगड मध्यम प्रकल्पातील पिण्याचे पाणी राखीव असताना अवैध उपसा कसा होतो, असा सवाल येथे उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित केला. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागद येथे पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे पत्र का दिले, अशा प्रश्नांचा मारा सुरू केला. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

पत्र लिहून घेतलेसरपंच सोनवणे यांनी सांगितले की, माझ्यावर दबाव टाकून तसेच पत्र लिहून घेतले. यावेळी लताबाई ठाकरे, नीता ठाकरे, ललिता परदेशी, सुनंदा पाटील, अनिता सोनवणे, फरिदा, शांता राजपूत, सुमन जाधव, नंदा राजपूत, विद्या मोरे, धना जाधव, पार्वता सोनवणे, नाना अहिरे, ईश्वर जाधव, रणवीरसिंग राजपूत, भोला महाजन, अमोल कुंभे, अशोक सोनवणे, अनिल पाटील, समाधान साळवे, राजेंद्र पाटील, संजय गडवे, विष्णू ससाने यांच्यासह शेकडो महिलांसह पुरुषांची उपस्थिती होती.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईagitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद