शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

'महिले नाव, चॅटिंग करायचे पुरुष'; फेसबुकवरील मैत्री पडली १९ लाख रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 1:21 PM

फेसबुकवर महिलेशी ओळख झाल्यानंतर त्यांचे मैत्रीत रूपांतर होऊन व्हाॅट्सॲपवर चॅटिंग सुरू झाले.

ठळक मुद्देजालन्यातील तीन जण गजाआड आरोपींना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : फेसबुकवरील महिलेशी मैत्री करण्याची किंमत सेवानिवृत्त रेक्टरला तब्बल १९ लाख १४ हजार रुपये एवढी मोठी मोजावी लागली. हे प्रकरण सायबर पोलिसांत गेल्यानंतर महिलेच्या अडून काही बापेच हे खाते चालवित असल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी जालन्यातील तीन आरोपींना अटक केली असून, त्यातील प्रत्येकी एक किराणा दुकानदार, रिक्षाचालक आणि विद्यार्थी आहे. (  Friendship on Facebook cost to Rs 19 lakh in Aurangabad ) 

विजय तुळजाराम मुंगसे (३०, रा. मस्तगड, जुना जालना), सय्यद अन्सार सय्यद अख्तर (३७, रा. शिस टेकडी, मोरंडी मोहल्ला, जुना जालना) आणि संतोष विष्णू शिंदे (२१, रा. हनुमान टेकडी, मस्तगड, जुना जालना) अशी आरोपींची नावे आहेत. समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त रेक्टर श्यामलाल गंगाराम चौधरी (६८, रा. तिसगाव, पो. वळदगाव, ता. जि. औरंगाबाद) यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१९ मध्ये त्यांची फेसबुकवर स्नेहा जाधव नावाच्या महिलेशी ओळख झाली. त्यांचे मैत्रीत रूपांतर होऊन व्हाॅट्सॲपवर चॅटिंग सुरू झाले. एप्रिल २०२० मध्ये स्नेहा जाधव हिने मुलगी आजारी असल्याचे सांगत त्यांच्याकडे चार हजार रुपये मागितले. अन्सार सय्यदचा बँक अकाउंट नंबर देत त्यावर ते पैसे टाकण्याचे सांगितले. जानेवारी २०२० मध्ये स्नेहाने ते पैसे परत केले.

स्नेहाने त्यानंतर जालना येथे माझ्या सासऱ्याच्या नावे निशा कॉम्प्लेक्स असून, ते कॉम्प्लेक्स माझ्या व माझ्या जावयाच्या नावे करायचे आहे. मात्र माझ्याकडे पैसे नाहीत अशी थाप मारून फिर्यादीकडे पैसे मागितले. पुढे विविध कारणे सांगत, आमिष दाखवून त्यांना अन्सार सय्यदच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यात ८ लाख ३६ हजार रुपये व संतोष शिंदेच्या एसबीआय खात्यात ९ लाख २८ हजार रुपये असे सुमारे १७ लाख ६४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पुढे सतत पैशांची मागणी सुरू झाली. चौधरी यांनी नकार देताच त्यांचा मुलगा व जावयास पुण्यात जाऊन गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणारा एसएमएस केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस कर्मचारी धुडकू खरे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, मन्सूर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के व छाया लांडगे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना २४ तासाच्या आत पकडले.

महिले नाव, बोलायचे पुरुषस्नेहा जाधव यांच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाऊंट पुरुषांनीच काढले होते. त्यांनी चौधरी यांचा मोबाइल नंबर घेऊन व्हॉट्सॲपवरही स्नेहा म्हणूनच चॅटिंग केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बाकी असल्यामुळे आराेपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी ४ सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी