शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

परराज्यात महिलांच्या विक्रीचा गोरखधंदा तेजीत; ६ वर्षांत औरंगाबादमधील ५०८ महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:08 PM

नोकरी, व्यवसाय व लग्नाच्या आमिषाने परप्रांतात नेऊन विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत

ठळक मुद्देशहरातून बेपत्ता महिलांचे नेमके झाले काय? कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून विक्री

- बापू सोळुंके औरंगाबाद : १५ दिवसांसाठी कामाला जायचेय अशी थाप मारून गरजू महिलांना परराज्यात नेऊन त्यांची विक्री केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. याप्रकरणी गतवर्षी जवाहनगर, हर्सूल ठाण्यात तीन महिलांची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर जिन्सी पोलिसांनी आणखी एका रॅकेटमधील आरोपींना चार दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. सहा वर्षांत शहरातून बेपत्ता असलेल्या ५०८ महिलांपैकी किती जणी रॅकेटच्या बळी ठरल्या आहेत, याचे गूढ मात्र उकलले नाही. 

कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून सोबत नेलेल्या गरजू महिलेचे लग्न तिच्या संमतीविना अनोळखी व्यक्तीसोबत लावले जाते. खरेदीदार काही दिवस तिचा सांभाळ करतो आणि नंतर तोसुद्धा त्या महिलेची दुसऱ्याला विक्री करतो. औरंगाबादेतील एका महिलेची दीड लाखात गुजरातच्या नीलेश पटेल याला अडीच वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. स्वत:ची सुटका करून औरंगाबादेत परतलेल्या महिलेने जिन्सी पोलिसांना तक्रार नोंदविली. यानंतर या रॅकेटमधील  दोन महिलांसह एका तरुणाला चार दिवसांपूर्वी अटक झाली. खरेदीदार नीलेश पटेल याला गुजरातमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले. हर्सूल परिसरातून कामासाठी गेलेल्या तरुणीला ७० हजार रुपयांत विकण्यात आले होते. हा प्रकार समजल्यानंतर हर्सूल पोलिसांनी खरेदीदार पिता-पुत्राला अटक केली होती. गारखेड्यातील इंदिरानगर येथील दोन गरजू महिलांची परप्रांतात विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला होता. यापैकी एक तरुणी अद्यापही पोलिसांना सापडली नाही. 

वर्षभरात तीन घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ या सहा वर्षांत ५०८ महिला बेपत्ता असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. या सर्व महिला १८ वर्षांवरील आहेत. यापैकी किती महिलांची लग्नासाठी परप्रांतात विक्री करण्यात आली, याबाबतची माहिती पोलिसांकडे नाही. असे असले तरी शहरातील महिलांना कामानिमित्त परराज्यात नेऊन विक्री केली जाते, हे वर्षभरातील तीन घटनांवरून स्पष्ट झाले आहे. 

‘त्या’ राज्यात मागणी

मुलींचा जन्मदर कमी असलेल्या राज्यातील तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही लग्न होत नसल्याने असे घोडनवरदेव गरजू महिलांची खरेदी करून त्यांच्यासोबत विवाह करीत असल्याचे समोर आले. महिलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे औरंगाबादमध्ये असल्याचे समोर आले. 

बेपत्ता महिलांची तक्रार आल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेऊन परत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्या महिला स्वेच्छेने घरातून निघून जातात. बऱ्याचदा त्या देहविक्रय व्यवसाय करतात. बदनामी होईल म्हणून त्या घरी येत नाहीत. बेपत्ता महिलांच्या विक्रीची आकडेवारी आमच्याकडे  नाही. मात्र, गतवर्षी जवाहरनगर, हर्सूल  आणि आता जिन्सी ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली.- डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

वर्ष    हरवलेल्या     शोध न लागलेल्या               महिला    महिलांची संख्या२०१४    ५१३         ३७२०१५    ६१८        ४८२०१६    ४८३        ५२२०१७    ४२८        ६०२०१८    ५५४        ७३२०१९    ६१२        ११९शोध न लागलेल्या महिला - ५०८

 

टॅग्स :WomenमहिलाKidnappingअपहरणPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद