भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२० या व्हर्च्युअल सोहळ्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, की औरंगाबाद शाखेने १२८ दिवसांत ७४ हजार अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या. यातून ४,६०० कोरोना रुग्ण शोधले. येत्या काळात औरंगाबाद शाखेचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी व मार्गदर्शक असेल. सोहळ्यात जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांचा आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन २०१९-२० पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच ३५ वर्षांच्या निरंतर सेवेकरिता गौतम संचेती यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या उपक्रमांच्या यशस्वितेकरिता पारस चोरडिया, प्रकाश कोचेटा, अमित काला, प्रवीण पारख, अनिल संचेती, राहुल झांबड आणि अभिजीत हिरप आदी परिश्रम घेत आहेत.