लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : धुळे-औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अनास्थेमुळे या महामार्गाच्या कामाची डेडलाईन हुकली आहे. मार्चअखेरची डेडलाईन हुकली असून, डिसेंबर २०१८ पर्यंतही रस्ता पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसते आहे. औरंगाबाद ते धुळेपर्यंतच्या कामाचे टेंडर गेल्या महिन्यात अंतिम झाले आहे. तर सोलापूर ते येडशीपर्यंतचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, येडशी येथील टोलनाक्याला विरोध सुरू झाला आहे.मार्च २०१८ पर्यंत रस्ता पूर्ण होईल, असा दावा केला जात होता. आता डिसेंबरअखेर रस्ता पूर्ण होण्याचा दावा एनएचएआय करीत आहे. सोलापूर ते येडशीपर्यंत रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.त्यापुढील रस्त्याचे काम मंदगतीने सुरू आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी जवळपास संपूर्ण भूसंपादन होत आले आहे. रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याची अधिसूचना काढण्यात आल्यानंतर कंत्राटदार कंपनी कंपनीला टोल वसूल करण्याची मुभा मिळणार होती. परंतु ८० टक्के काम पूर्ण होण्यापूर्वीच येडशी येथे टोल उभारण्यात आला आहे. तेथील टोल वसुलीला विरोध सुरू झाला आहे.अपघातांचे प्रमाण वाढलेचौसाळा, मांजरसुंबा, बीड (बायपासचे काम जवळपास पूर्ण), शहागड, पाचोड, आडूळपर्यंतचे काम अर्धवट झालेले आहे. चौपदरी आणि कुठे वळण दिल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. झाल्टा, गांधेलीमार्गे वाल्मी ते करोडीमार्गे कन्नड ते धुळे या उर्वरित महामार्गाच्या कामाच्या निविदा मंजूर होऊन काम सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसºया टप्प्यामध्ये महसूल विभागाकडून बहुतांश भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. महामार्गातील ७०० पैकी ६६२ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आली आहे. जुन्या रस्त्यावर पूर्णत: खड्डे पडले असून, औरंगाबाद ते बीडपर्यंत महामार्गावरून प्रवास करताना अनेक अडचणी येत असल्याचे वाहनचालक आणि प्रवासी सांगतात.
औरंगाबाद-धुळे महामार्गाचे काम अर्धे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:33 AM
धुळे-औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अनास्थेमुळे या महामार्गाच्या कामाची डेडलाईन हुकली आहे. मार्चअखेरची डेडलाईन हुकली असून, डिसेंबर २०१८ पर्यंतही रस्ता पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसते आहे.
ठळक मुद्देडेडलाईन हुकली : सोलापूर ते येडशीपर्यंतचेच झाले काम; नाक्याला विरोध