सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारे काम दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद होते. त्यामुळे कोणी फिरकले नाही. याच काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अपघातविरहीत सुखद प्रवास व्हावा, हाच उद्देश ठेवून प्रशासनाने पुलाचे काम सुरू केले आहे.
सकाळ आणि संध्याकाळी इंडस्ट्रीज एरियात कामासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या कामगारांची वर्दळ असते. जालना रोडवर वाहतूक सुसाट असते. या ठिकाणी काम करणारे ठेकेदार काम कधीपर्यंत संपेल, हे सांगायला तयार नाहीत, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पुलाचे काम कधी चालू, तर कधी बंद अशा अवस्थेत सुरू आहे. कामाची गती वाढवावी, अशी मागणी शेख समीर भैरव ढवाळ, इम्रान, अनिस शेख, राजू खरात यांनी केली आहे.
फोटो कॅप्शन
मुकुंदवाडी जालना रोडवर संथ गतीने सुरू असलेले पुलाचे बांधकाम.