शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वर्क फ्रॉम होमचा लठ्ठपणा वाढीला हातभार, वर्षभरात सारेच होऊ लागले गोलमटोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 6:15 PM

शालेय विद्यार्थ्यांपासून मोठ्या व्यक्तींमध्ये स्थूलपणाची समस्या

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना काळात अनेक दिवस घराबाहेर पडणे बंद झाले होते. ऑफिसचे कामही घरातूनच सुरू होते. यामुळे अनेकांचे वजन वाढले. परिणामी काहींचे आरोग्यही बिघडले. यातून सावरत अनेकांनी वजन पुन्हा नियंत्रणात आणले. तर काही जण अजूनही कसरत करीत आहेत.

गतवर्षी लॉकडाऊन घोषित झाले. तेव्हा कोणाचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू झाले. कोणाला दुकान बंद ठेवून घरी बसावे लागले. तर काहींना नोकरीच गमवावी लागली. या सगळ्यात वजनवाढीची समस्या वाढली. लाॅकडाऊनमुळे मुलांचे शाळेत जाणेही बंद झाले. मैदानी खेळातून मुलांचा जो काही व्यायाम होत होता, तोही बंद झाला. घरीच असल्याने सतत खाणे सुरू झाले आणि मुले लठ्ठ झाली. ही घातक गोष्ट आहे. नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या वजनापेक्षा ३ ते ५ किलोंनी जात वजन वाढल्याचेही डॉक्टरांना आढळून आले.

६८ किलोवरून ८६ किलोलाॅकडाऊनमध्ये घरीच थांबावे लागले. त्यामुळे माझे वजन ६८ किलोवरून ८६ किलोपर्यंत वाढले. शरीराचा आकारच बिघडून गेला होता. त्यानंतर प्रकृती खराब झाली होती; पण आता ६३ किलो वजन आहे.- शंकर बखळे

१२ किलो वजन वाढलेमाझे १२ किलो वजन वाढले होते. आता नियमितपणे व्यायाम करतो व सकाळी फिरतो. त्यामुळे आता वजन नियंत्रणात आहे.- रियाज खान जब्बार खान

१० किलो वजन वाढलेलाॅकडाऊन लागल्यानंतर घरूनच काम करावे लागले. त्यामुळे १० किलो वजन वाढले. आता व्यायाम सुरू करण्याचा विचार आहे.- एक महिला

आता वजन कमी कसे करणार?प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, शारीरिक रचना आणि क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या क्षमतेनुसार व्यायाम करण्यास प्राधान्य दिला पाहिजे. पायी चालणे वा सायकलिंग, योगा करणे फायद्याचे ठरते. कोणत्याही व्यायामाची सुरुवात एकदम करता कामा नये. हळूहळू सुरुवात करावी. सरावानंतर प्रमाण वाढवावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा. त्याबरोबर सकस आहार घ्यावा.

व्यायामासह आहार महत्त्वाचाबैठे काम करावे लागत असेल अधूनमधून फिरले पाहिजे. सकाळच्या वेळी किमान ५० मिनिटे ते एक तास फिरले पाहिजे. खाण्यावर नियंत्रण पाहिजे. जंक फूड टाळा. कमी कॅलरी असलेले परंतु व्हिटॅमिन असलेले पदार्थ सेवन करून तेलकट पदार्थ टाळावेत.- डाॅ. प्रभाकर जिरवणकर, प्राध्यापक, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य