शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

जळगाव रस्त्याचे काम पैशाअभावी बंद; लक्ष कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 6:09 PM

अजिंठा आणि जळगावपर्यंत जाणाऱ्या नागरिकांचे हाल

ठळक मुद्देदीड वर्षापासून काम चालूऔरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत ८७० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम पैशांअभावी बंद पडले असून, कंत्राटदाराला बँकेकडून हमी मिळत नसल्यामुळे त्याने तोंड दडविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याचे ३० टक्केच काम झाले असून, उर्वरित काम पैसे मिळाले तरच वेगाने होण्याची शक्यता आहे. 

राज्य महामार्ग प्राधिकरणाची सर्व सूत्रे मुंबईतून हालत असल्यामुळे स्थानिक कार्यालयातील अभियंत्यांना कंत्राटदार काहीही दाद देईना, तर मुंबई आणि दिल्लीतून पैसे देण्यासाठी कुणीही लक्ष घालेना. परिणामी, पर्यटक, शासकीय कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना औरंगाबाद ते जळगावपर्यंत जाण्यासाठी रोज धूळ आणि चिखलातून प्रवास करत जावे लागते आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी चौपदरी रस्ता असावा, यासाठी लोकमतने तीन वर्षे वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतच्या पाठपुराव्याची दखल घेत भूमिपूजनाच्या दिवशी त्या रस्त्याच्या कामाला चौपदरीकरणाची तत्त्वत: मंजुरी दिली. त्यामुळे रस्त्याच्या खर्चाचा आकडा ८७० कोटींत गेला; परंतु कागदोपत्री तरतूद होण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने उशीर केला. दरम्यानच्या काळात कंत्राटदाराने पूर्ण रस्ता खोदून टाकला. सरकारी कार्यालये आणि लेण्यांकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि पाठीच्या दुखण्यासह नागरिक दीड वर्षापासून त्रस्त आहेत.  

औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन टप्प्यांत ८७० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. आंध्र प्रदेशमधील ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट असून, चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी दिल्ली मुख्यालयाकडे २० हेलपाटे मारल्यानंतर मंजुरी मिळाली; पण पैसे मिळण्यास दिल्लीकरांनी हात आखडता घेतला. 

अधीक्षक अभियंत्यांचे मत असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी सांगितले, अजिंठा ते सिल्लोड या टप्प्यातील कामाला पैसे मिळालेले नाहीत. दोन टप्प्यांतील पैसे मिळालेले आहेत. कंत्राटदाराला पुढील टप्प्यासाठी बँक गॅरंटी मिळालेली नाही. एका बाजूचे शेवटच्या अडीच किलोमीटरमध्ये काम बाकी आहे. फुलंब्री ते पाल फाट्यापर्यंत एका बाजूने काम झाले आहे. दुसरी बाजू पूर्णत: बाकी आहे. ३० टक्केच काम झाले आहे. सुधारित करार कंत्राटदाराबरोबर करावा लागणार आहे. तेव्हा कामाची डेडलाईन ठरेल. कंत्राटदाराला बँक गॅरंटी मिळण्यात आहे.

५० टक्के रक्कम तरीही ३० टक्केच काम ८७० कोटींपैकी सुमारे ६०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद झाली आहे. मूळ काम २७0 कोटींचेच होते. साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता होईल. शहरात आल्यावर रस्त्याची रुंदी वाढेल. ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला आजवर दिली आहे.३०४ कोटी पहिल्या टप्प्यात२५० कोटी दुसऱ्या टप्प्यात३१६ कोटी तिसऱ्या टप्प्यात 

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनfundsनिधीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग