शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

निविदा एकाची काम दुसऱ्याला

By admin | Published: July 15, 2017 12:53 AM

औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेकडे ८० हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत

मुजीब देवणीकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेकडे ८० हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करणे, सर्वेक्षण करणे, प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. निविदा प्रक्रियेत ज्या संस्थेने मनपाकडे निविदा दाखल केली त्या संस्थेसोबत आणखी एका संस्थेला काम देण्याचा प्रताप मनपा अधिकाऱ्यांनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १२ कोटी ३६ लाख रुपयांच्या या कामासाठी अधिकाऱ्यांनी हा खटाटोप केला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ मध्ये महापालिकेला रमाई आवास आणि राजीव गांधी आवास योजनेंतर्गत तब्बल ५५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतील फक्त १८ कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आहेत. उर्वरित रक्कम आजही महापालिकेच्या खात्यात पडून आहे. लाभार्थी घरे बांधून द्या म्हणून मनपा अधिकाऱ्यांकडे उंबरठे झिजवत आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या हृदयाला पाझर फुटायला तयार नाही. घरकुल योजनेची पूर्णपणे अधिकाऱ्यांनी ‘वाट’लावलेली असताना केंद्र शासनाने मागील वर्षीपासून पंतप्रधान आवास योजना सुरू केली. औरंगाबाद शहरात योजना राबविण्यासाठी महापालिकेची निवड केली. शहरातील इच्छुक नागरिकांचे अर्ज आठ महिन्यांपूर्वी मागविण्यात आले. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. ८० हजार ५०० नागरिकांनी मनपाकडे अर्ज केले. अर्जांची छाननी करण्यासाठी मनपाने खाजगी प्रकल्प सल्लागार संस्था नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निविदा मागविल्या. निविदेत आर्क असोसिएटस्ने निविदा दाखल केली. अधिकाऱ्यांनी ७ एप्रिल रोजी स्थायी समितीला प्रस्ताव सादर केला. समिती सदस्यांना अंधारात ठेवून ऐनवळीत हा विषय टाकून मंजूरही करून घेतला. मंजूर प्रस्तावात १५ हजार रुपये प्रतिघरकुलांप्रमाणे आणि डीपीआर तयार करण्यासाठी एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये आर्क असोसिएटस् आणि सीमा कन्सल्टंटला द्यावेत, असे प्रस्तावात म्हटले आहे.