शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

By साहेबराव हिवराळे | Published: January 05, 2024 4:55 PM

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-६ परिसरातील मथुरानगर, संभाजी कॉलनी कामगार कुटुंबियासाठीची वसाहत आहे. त्या ठिकाणी कौटुंबिक गरजेनुसार राहण्याची सुविधा झाली परंतू मुलभूत गरजा सिडकोतून मनपात आल्यानंतर फारशा प्रमाणात प्रामुख्याने सोडविल्या नाहीत. कामगारांची मुलं डॉक्टर,वकील, इंजिनिअर, बँक तसेच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहेत.

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत. परंतु, अस्वच्छतेतून कधी उजाडणार मथुरानगर- संभाजी काॅलनीची पहाट अशी अवस्था आहे. सिडकोत असताना येथील नागरिकांना सिडको सेवासुविधा देत होती. आता मनपाकडे हस्तांतरण झाल्यावर सेवासुविधा देण्याची जबाबदारी आहे. परंतु त्या काळात टाकलेल्या ड्रेेनेज लाईनवरच वाढलेल्या कुटुंबाचा भार आहे. त्यामुळे मथुरानगरात ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रकार दिवसाआड बघायला मिळतात. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही त्याचे निराकरण होत नाही. कचरा गाड्या घरापर्यंत येऊन कचरा घेऊन जाणार असा नियम असतानाही गाड्या सरळ रस्त्याने निघून जातात अन् त्यामुळे नागरिक घरातील कचरा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानावर टाकून निघून जातात. परंतु जेव्हा घरी ये-जा करताना अनेकदा नाक दाबून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

औषध फवारणी करणाऱ्यांचाही फेरफटका येथे दिसत नाही, त्यामुळे डासाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतो. परिसराची भौगोलिक रचना टेकडीची असल्याने घराची उंची समान दिसत नाही. असे विविध प्रश्न नागरिकांचा पाठलाग सोडत नसल्याची खंत स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

उद्यानात दारूड्यांची भीतीमथुरानगर व संभाजी कॉलनीच्यालगत असलेल्या भव्य-दिव्य उद्यान सिडकोने हस्तांतर केले. मात्र, त्याची दुरावस्था झाली आहे.

उद्यानात सुरक्षा महत्वाचीउद्यानात बोअरवेल पेव्हर ब्लॉक, जाॅगिंगसाठीची तयारी असली तरी येथे दारूच्या रिकाम्या बाटली अन् दारूड्याचा आश्रय असल्याने येथे इतरांंना चांगल्या कामासाठी वापर करणे शक्य होत नाही.- मनिष नरवडे

कचऱ्याची विल्हेवाट लावावीसुंदर शहर स्वच्छ शहर ही घंटा गाडीवरील गीत ऐकून शहर कचरा मुक्त होणार, अशी आशा बळावली होती. परंतु गाड्या घरापर्यंत येऊन कचरा नेत नाहीत. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास किती दिवस सहन करावा.-कुणाल परदेशी

रस्त्यावर ड्रेनेजचे पाट कधी थांबणार?जुन्याच ड्रेनेज लाइन असल्याने त्यावर अधिकचा भार पडत आहे. पावसाळ्यात तर रस्ते ओलेच असले तर समजून घेता येते; परंतु हिवाळा आणि उन्हाळ्यातही ड्रेनेज चोकअप होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागते. जुन्या लाइन बदलून नवीन लाइन टाकण्याची गरज आहे.- कृष्णा नरवडे

अंतर्गत रस्ते सुधार कधी?मुख्य रस्ते गुळगुळीत केलेले आहेत. परंतु, अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. रस्त्यावरून घर गाठताना ओबडधोबड रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होते आणि नागरिकांना पाठदुखीचा ही आजार जडत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. अंतर्गत रस्त्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी आहे.- आकाश साबळे

बिघडलेल्या बोअरवेल सुधारासिडको एन-६ परिसरात लोकप्रतिनिधी तसेच मनपाच्या वतीने बोअरवेल टाकण्यात आलेले आहेत. परंतु, त्यापैकी जुन्या मनपाच्या शाळेतील बोअरवेल फक्त सुरू असून, त्याचा जनतेला काही फायदा नाही. इतर बोअरवेल बिघडलेले असताना मनपाच्या टंचाईत ते मनपाने दुरुस्ती केलेले नाही.- किरण पाटील शिरवत 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका