औरंगाबाद - मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना औरंगाबादमध्ये काळं फासले आहे. औरंगाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं आहे. सराटेंच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम दिल्याने विरोध दर्शवला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तेथे आलेल्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहिती अशी की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या.एम.जी.गायकवाड हे औरंगाबादेत आहेत. सुभेदारी विश्रामगृह येथे ते याविषयी समाजाच्या विविध पदाधिकाºयांशी भेटून त्यांचे म्हणने एकूण घेत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आयोगाला निवेदन देण्यासाठी जमले होते. यावेळी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे हे तेथे दाखल झाले.
सराटे हे मराठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त एजन्सीचे ते काम करीत असल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी त्यांना सुभेदारीवर गाठले आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी सराटेविरोधात घोषणा दिल्या. यावेळी रविंद्र काळे, आप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे पाटील, रमेश गायकवाड, अभिजीत देशमुख, विनोद पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती.